Breaking
ब्रेकिंग

भाच्याने मामाच्या डोक्यात खलबत्ता हाणत केली हत्या, आरोपीस अटक ; आकोली(हेटी) येथील घटना

1 6 9 6 3 0

सचिन धानकुटे

सेलू : – भाच्याने मामाच्या डोक्यात खलबत्ता हाणून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील आकोली(हेटी) येथे आज सायंकाळी घडली. सुधाकर जनार्दन लोहे(वय४८) असे मृतक मामाचे तर संघपाल विनोद भोंगाडे(वय२२) असे आरोपी भाच्याचे नाव आहे.                        

      मिळालेल्या माहितीनुसार, आकोली(हेटी) येथील मृतक सुधाकर लोहे हे आज शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रात्रीच्या जेवणाची तयारी करीत होते. दरम्यान त्यांचा मनोरुग्ण असलेला भाचा संघपाल हा त्यांच्याकडे स्वंयपाकघरात आला आणि त्याने मामाच्या डोक्यावर खलबत्त्याने वार करीत त्यांची निर्घृणपणे हत्या केली. सदर बाब लक्षात येताच गावात मोठी खळबळ उडाली. सदर घटनेची माहिती सेलू पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, उपनिरीक्षक निमगडे, गणेश राऊत, देवा वनवे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी भाचा संघपाल यास ताब्यात घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. 

     आरोपी संघपाल हा मनोरुग्ण असल्याने नेहमीच अशाप्रकारे कोणावरही धावून जात असल्याचे सांगितले जाते. आज देखील त्याने अशाचप्रकारे मामावर हल्ला चढवल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. सधर घटनेमुळे गावात मात्र हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 6 9 6 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे