Breaking
ब्रेकिंग

भरधाव आयशरने गायींच्या कळपास चिरडले..! सात जनावरांचा मृत्यू, तीन जखमी, शिवणगांव येथील घटना

2 6 6 6 5 8

सचिन धानकुटे

सेलू : – भरधाव आयशरने गायींच्या कळपास चिरडल्याने झालेल्या अपघातात सात गायींचा मृत्यू तर तीन जखमी झाल्याची घटना आज तालुक्यातील शिवणगांव येथे सकाळच्या सुमारास घडली. यात वाहनचालकासह दोन मजूर देखील जखमी झाले असून आयशरचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने भरधाव आयशर अनियंत्रित होत सदर अपघात घडल्याचे सांगितले जाते. 

     मिळालेल्या माहितीनुसार, बुट्टीबोरी येथून एम एच ४० बिजी ९५१४ क्रमांकाचा आयशर हिंगणीच्या नोबल एक्सप्लोसिव्ह कंपनीत लोखंडी रॉड घेऊन जात होता. दरम्यान हिंगणी नजिकच्या शिवणगांव येथील आरोग्य उपकेंद्राजवळील उतारावर भरधाव आयशर अचानक अनियंत्रित झाला आणि तो रस्त्याने जाणाऱ्या गायींच्या कळपात घुसला. ही घटना आज शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये सात गायींना जोरदार धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर तीन गायी किरकोळ जखमी झाल्यात. यावेळी भरधाव आयशर हा नजिकच्या नाल्यात पलटी झाल्याने वाहनचालक आणि दोन मजूर देखील जखमी झाले. अपघातावेळी वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगितले जाते. हिंगणी येथील शेतकरी अरविंद अरुण दरणे यांच्या मालकीच्या त्या गायी असून त्यांचे या अपघातात दिड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलविले. तसेच सेलू पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करीत वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 6 6 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे