Breaking
ब्रेकिंग

ॲम्ब्युलन्सचा चक्क दारुच्या वाहतूकीसाठी वापर..! दारुबंदी असलेल्या गांधी जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

2 6 8 6 2 9

सचिन धानकुटे

वर्धा : – ॲम्ब्युलन्समधून रुग्णांऐवजी चक्क दारुची वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार दारुबंदी असलेल्या गांधी जिल्ह्यात सेवाग्राम पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघडकीस आला. यानिमित्ताने रुग्णवाहिकांचा सुरू असलेला अनागोंदी कारभार उजेडात आला असून जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

दारूची वाहतूक करणाऱ्या ॲम्बुलन्स ला सेवाग्राम पोलिसांनी पकडले

   सेवाग्राम पोलिसांनी मौजा पवनार ते सेवाग्राम रस्त्यावरील संजीवनी आश्रमाजवळ काल सुरेंद्र उर्फ सोनु नामदेव चौधरी(वय३७) रा. वरुड, किसना नरबहादुर भिका(वय३८) रा. करंजी रोड, सेवाग्राम, राजेंद्र लक्ष्णम इंगळे(वय४७) रा. हावरे ले-आउट सेवाग्राम व गजानन गोविंद नेहारे(वय५३) रा. जुनीवस्ती सेवाग्राम अशा चौघांनाही नाकेबंदी दरम्यान अटक केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील ॲम्ब्युलन्समधून कापडी थैलीत असलेले विदेशी दारुचे तीन बंपर, ओसी ब्ल्यु कंपनीच्या २० शिश्या, रॉयल स्टॅग कंपनीच्या ६२ शिश्यासह एक पांढ-या रंगाची बोलेरो कंपनीची एमएच ३४ बिजी २८०३ क्रमांकाची ॲम्ब्युलन्स असा एकूण ५ लाख २६ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेत त्यांच्यावर मुंबई दारुबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. यानिमित्ताने दारुबंदी असलेल्या गांधी जिल्ह्यात रुग्णवाहिकेच्या आडून अवैधरित्या दारुची वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

     ही कारवाई सेवाग्राम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनीत घागे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार हरिदास काक्कड, नायक पोलीस शिपाई गजानन कठाणे, पोलीस शिपाई अभय इंगळे, प्रदीप कुचनकर आदी कर्मचाऱ्यांनी केली.

5/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 8 6 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे