Breaking
ब्रेकिंग

नवसाला पावणारी भोंडाई माता..! निसर्गाच्या सानिध्यात टेकडीच्या पायथ्याशी वसलंय बोरी कोकाटेचं ग्रामदैवत, नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी

2 6 8 5 7 5

सचिन धानकुटे

सेलू : – बोर व्याघ्र प्रकल्पातील निसर्गाच्या सानिध्यात टेकडीच्या पायथ्याशी वसलेल्या भोंडाई मातेच्या दर्शनासाठी सध्या नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी असते. बोरी कोकाटे येथील ग्रामदैवत असलेल्या भोंडाई मातेची परिसरात नवसाला पावणारी देवी अशी ख्याती आहे. याठिकाणी नवरात्रोत्सवात विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला आहे.

    सेलूपासून सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरी कोकाटे गावाच्या अगदी शेजारी जंगलाच्या कुशीत भोंडाई मातेचं मंदिर वसले आहे. अडेगांवच्या पायदळ रस्त्यावर चौकी असलेल्या ठिकाणी अतिशय प्राचीन मंदिर असून याठिकाणी भोंडाई मातेची मनमोहक अशी स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना घनदाट जंगल आणि दर्शनी भागात असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या या मंदिरात नवरात्रोत्सवात भक्तांची मोठी मांदियाळी असते. त्याकाळी घोराड येथील स्व नारायण उमाटे या देवी भक्ताने लोकसहभागातून याठिकाणी मंदिराचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते. याठिकाणी पूरणपोळीच्या स्वयंपाकाची प्रथा असून पूर्वी येथे बैलगाडीच्या माध्यमातून भाविक नवरात्रोत्सवात यायचे. हिंगणी ते अडेगांव या पायदळ रस्त्यावर भोंडाई मातेचं मंदिर असल्याने वाटसरू याठिकाणी आवर्जून विसावा घेत होते. परंतु त्याकाळी येथे पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती, त्यामुळे स्वयंपाकासाठी येणाऱ्या भाविकांना बैलगाडीनेच पाणी घेऊन यावे लागायचे. त्यावेळी पिण्याच्या पाण्यासाठी याठिकाणी विहीर देखील खोदण्यात आली, परंतु त्याकाळी काळ्या दगडामुळे येथील विहिरीला काही पाणी लागलं नाही. कालांतराने भाविकांच्या अपार श्रद्धेला फळ मिळाले आणि त्या विहिरीला जलाजम असं पाणी लागलं, ते आजतागायत कायम आहे. येथील पाण्याचा कितीही उपसा झाला तरी साठा जैसे थे होतोच, ही भोंडाई मातेची किमयाच म्हणावी लागेल.

    येथील मंदिर निसर्गरम्य परिसरासह जंगलाच्या कुशीत वसल्याने आणि लागूनच व्याघ्र प्रकल्प असल्याने याठिकाणी नेहमीच व्याघ्र दर्शनाचा योग जुळून येतो. येथे सध्या नवरात्रोत्सवात उमाटे महाराज, मनोज करपाते, सुधीर चौधरी, राजू कुमरे, किशोर राऊत, श्रीकांत कोकाटे, पोलीस पाटील विकास कोकाटे, दुर्गेश बावणे आदी मंडळी संपूर्ण व्यवस्था सांभाळतात.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 8 5 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे