Breaking
ब्रेकिंग

अरुणाताई चाफले इंडीयन डायमंड डीग्निटी अवार्डने सन्मानित

2 6 8 6 2 1

कारंजा (घा.) : – येथील राष्ट्रीय युवा उदय संस्थेच्या अध्यक्षा अरुणाताई चाफले यांना नुकताच राजस्थानातील जयपूर येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय मैत्री संमेलनात इंडीयन डायमंड डीग्निटी अवार्डने सन्मानित करण्यात आले. 

    त्यांच्या संस्थेअंतर्गत येथे स्व. राजीव गांधी मेमोरियल इंग्लिश हायस्कूल ॲंड ज्युनियर कॉलेज व एआरसी पब्लिक स्कूल नामक दोन्ही शाळांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली. त्यांच्या शिक्षण तसेच महिला सशक्तीकरण आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. यासोबतच त्यांना मिमांसा-२०२४ या पुरस्काराने देखील नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. सदर पुरस्कार अथॉस एज्युकेशन सोल्यूशनच्या वतीने सर्व शाळांतील उत्कृष्ट शिक्षण प्रणालीच्या आधारावर त्यांना प्रदान करण्यात आला. यापूर्वी ही त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये मेस्टा संघटनेच्या वार्षिक अधिवेशनात उत्‍कृष्‍ट शिक्षण संस्थाचालक पुरस्कार, दोन कोटी वृक्ष लागवडीत सहभागी झाल्‍याबद्दल तसेच दैनिक सकाळच्या वतीने दिल्या जाणार्‍या महाराष्ट्र आयडॉल पुरस्काराने नागपूर येथील कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला होता. यासोबतच एज्युकेशन आयकॉन ऑफ द इयर या पुरस्काराने ही मुंबई येथे गौरविण्यात आले आहे. त्यांना नुकत्याच मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे कर्मचारी तसेच विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 8 6 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे