Breaking
ब्रेकिंग

हिंगणीचा २५ वर्षांची परंपरा असलेला “एक गाव एक देवी” उपक्रम

2 6 9 1 9 4

सचिन धानकुटे

सेलू : – तालुक्यातील हिंगणी येथे “एक गाव एक देवी” उपक्रमा अंतर्गत एकाच ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना केली जाते. याठिकाणी गेल्या पंचवीस वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात आहे. स्थानिक आई भवानी दुर्गा पूजा उत्सव समितीच्या वतीने याठिकाणी यंदा देवीची प्रतिष्ठापना करण्यात आलीयं.

    हिंगणी या संपूर्ण गावात एकच सार्वजनिक मंडळ असून गेल्या पंचवीस वर्षांपासून “एक गाव एक देवी” हा उपक्रम निरंतरपणे राबविला जातो. स्थानिक आई भवानी दुर्गा पूजा उत्सव समिती व आई भवानी मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी येथे विविध सामाजिक कार्यक्रमांसह भव्य अशा महाप्रसादाच्या कार्यक्रमाचं आयोजन नित्यनेमाने केले जाते. यावर्षी या सार्वजनिक मंडळाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने महाआरतीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. सदर मंडळाचे अध्यक्ष शुभम सराफ, सचिव प्रमोद डेकाटे, कोषाध्यक्ष किसना कामडी सह मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनात व्यस्त असून याठिकाणी नवही दिवस विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 9 1 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे