Breaking
ब्रेकिंग

शरदचंद्र पवार यांच्या बाबत अपशब्द खपवून घेणार नाही – समीर देशमुख : नामदेव जाधव यांच्या विरूद्ध समाजात तेढ निर्माण करत असल्याबाबत पोलिसात तक्रार

2 2 5 3 5 8

वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या बाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देत मराठा समाजाला व मराठा तरुणांना चिथावणी देणाऱ्या नामदेव जाधव यांच्या विरुद्ध समाजात तेढ निर्माण करीत असल्याबद्दल दि. 12 नोव्हेंबर 2023 ला गुन्हा दाखल करण्यासाठी समीर देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वर्धा शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार केली.

सविस्तर असे की प्रा.नामदेव जाधव यांचे सोशल मीडीया, फेसबुक, यूट्यूब, इनस्टाग्राम यावर साडेपाच लाख फॉलोवर्स असून यांचे काही व्हिडीओत ते मराठा समाजाला व मराठा तरुणांना चिथावणी देऊन शरदचंद्र पवार यांच्या बाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचे दिसते. हा इसम सतत विडिओ व रिल्स तयार करून त्या सोशल मिडियावर शेअर करीत असतो. त्यामुळे हजारो, लाखो लोक त्याने शेअर केलेले विडिओ व रिल्स पहात असतात असे निदर्शनास आले. मुंबई तक आणि वायरल बातमी या चॅनेल वर देखील त्याची मुलाखत घेण्यात आलेली आहे. सदर व्यक्ती स्वतःला राजमाता जिजाऊ यांचे चौदावे वंशज असल्याचे खोटे सांगून जनतेची दिशाभूल करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

शरचंद्रजी पवार हे महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री, देशाचे स्वंरक्षण मंत्री, कृषी मंत्री होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून त्यांना मानणारा एक मोठा वर्ग देशात आहे. शरदचंद्र पवार साहेबांविषयी प्रा.जाधव हे सतत अत्यंत खोटी, चुकीची, बिनबुडाची माहिती प्रसारित करून साहेबांची बदनामी करत आहे. हा सर्व प्रकार अत्यंत संतापजनक असून साहेबांबाबत अपशब्द अजिबात खपवून घेणार नाही अस समीर देशमुख म्हणाले. 

मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून खूप चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल होतं. त्यांनी २४ डिसेंबरपर्यंतची वेळ सरकारला दिल्यानंतर उपोषण मागे घेतलं असलं तरीही आंदोलन सुरूच ठेवलं आहे. मागील बऱ्याच वर्षापासून मराठा आरक्षणाचा विषय सुरू आहे, कित्येक तरूणांनी आत्महत्या केल्या, तसेच तरूण मुलांनी कित्येक बसेस आणि गाड्या जाळल्या, कित्येक ठिकाणी जाळपोळ केली गेली त्यामुळे देशाचे वातावरण खूप भीती दायक बनले होते आणि अशा घटनांना प्रा.नामदेव जाधव सारखे लोक जबाबदार आहेत, जे मराठी तरूणांची माथी भडकविण्याचे काम सतत करीत आहेत. मराठी तरूणांची माथी भडकावून त्यांना हिंसक कारवाया करायला लावून, देशात हिंसाचार व्हावा हा उद्देश या व्यक्तीचा असून त्याने देशविघातक कृत्य केले आहे. दोन जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून दंगल घडविण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन त्याला कडक शाषण होणे अत्यंत गरजेचे आहे असे समीर देशमुख यांनी सांगीतले. सदर तक्रार वर्धा शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष मुन्ना झाडे, कृ.उ.बा.स सिंदी चे अध्यक्ष केसरीचंद खंगारे, युवक अध्यक्ष प्रणय कदम, गुणवंत कडु, प्रशांत कुत्तरमारे, संदीप धुडे, शाम वानखेडे, राहुल घोडे, अनंत भाकरे, सचिन ठाकरे, रवी संगतानी, संकेत तळवेकर, रोशन राऊत, प्रज्वल धंदरे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 2 5 3 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे