Breaking
ब्रेकिंग

वर्ध्याच्या अग्निहोत्री परिवारात रक्तरंजित राडा..! चाकू हल्ल्यात दोघं गंभीर जखमी, रामनगर पोलिसांत दोन्ही गटातील मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल

2 6 6 6 4 4

वर्धा : – शहरातील शिक्षणसम्राट शंकरप्रसाद अग्निहोत्री आणि गिरीश अग्निहोत्री परिवारा दरम्यान काल रात्रीच्या सुमारास बॅनरच्या वादातून रक्तरंजित राडा झाला. यावेळी झालेल्या चाकू हल्ल्यात दोन जण गंभीर झाले आहेत. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध केलेल्या तक्रारीवरून एकूण नऊ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

     मिळालेल्या माहितीनुसार, रामनगर परिसरातील तुळजाभवानी मंदिराच्या समोर शिक्षणसम्राट शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्याशी काल शनिवारी रात्री सात वाजताच्या सुमारास संजय, आदित्य, मनिष आणि गिरीश अग्निहोत्री यांनी वाद घातला. तुळजाभवानी मंदिराच्या समोर असलेला गिरीश अग्निहोत्री यांच्या नावाचा बॅनर काढल्याच्या कारणांतून सदर वाद निर्माण झाला होता. यासंदर्भात सूरज आणि सचिन अग्निहोत्री हे जाब विचारण्यासाठी गेले असता गिरीश व आदित्य अग्निहोत्री यांनी सूरजवर चाकूने हल्ला चढवला आणि त्यास गंभीर जखमी केले तर संजय व मनिष अग्निहोत्री यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी सूरजच्या तक्रारीहून गिरीश, आदित्य, संजय व मनिष अग्निहोत्री यांच्यावर रामनगर पोलिसांत भारतीय न्याय संहिताचे कलम १०९(१), ३५२, ३(५) आदि कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     दुसरीकडे आदित्य संजय अग्निहोत्री याने रामनगर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार शंकरप्रसाद, सचिन व सूरज अग्निहोत्री सह गणेश ड्रायव्हर व अभिजित रघुवंशी यांच्यावर भारतीय न्याय संहिताचे कलम १०९(१), ११८(१), १९१(३), ३५२ आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

3.2/5 - (5 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 6 6 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे