खा. शरदचंद्र पवार यांच्याशी बोलल्यानंतर समीर देशमुख यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे
पशुधनाची तस्करी उजेडात
____________________________________
वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्र पवार साहेब, प्रदेश अध्यक्ष आ. जयंतजी पाटील, खा. सुप्रियाताई सुळे यांनी सकाळी समीर देशमुख यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते समीर देशमुख यांनी आपला वर्धा विधान सभेचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.
या विषयी बोलताना ते म्हणाले, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेब यांनी स्वतः मला कॉल करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले. वर्धा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला सोडण्याकरीता आपण प्रयत्न केले मात्र वाटाघाटीत ते शक्य झाले नाही. आपण उमेदवारी अर्ज मागे घेऊन आघाडी धर्म पाळावा, असेही ते म्हणाले. निश्चित आपल्या पुढे संधी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
प्रदेश अध्यक्ष आ. जयंतजी पाटील आणि खा. सुप्रियाताई सुळे यांनी आत्ता पर्यंतच्या आपल्या कार्याची दखल घेऊन भविष्यात सर्व प्रकारची मदत होईल, असे आश्वासित केले असून महाविकास आघाडी च्या उमेदवाराला सहकार्य करावे याबाबत ही त्यांनी समीर देशमुख यांना सांगितले.
समीर देशमुख यांनी पक्ष श्रेष्ठीच्या आदेशाचा सन्मान करून आपण वर्धा विधानसभा अपक्ष उमेदवारीचा अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले.