युवा संघर्ष यात्रा सर्वांना नवी दिशा देणार – संजय शेटे
वर्धा : राज्यातील तरुण, बेरोजगार युवक तथा शेतकर्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते आमदार रोहीतदादा पवार यांनी पुणे ते नागपूर पायदळ युवा संघर्ष यात्रा सुरु केली आहे. या यात्रेचा केंद्रबिंदू युवक जरी असला तरी समाजातील सर्व घटकांचे प्रश्न या संघर्ष यात्रेतून सोडवण्याचा प्रयत्न आ.रोहित पवार करणार असून युवा संघर्ष यात्रा सर्वांना नवी दिशा देणार असल्याचे मत संजय शेटे यांनी व्यक्त केले. युवा संघर्ष यात्रेच्या नियोजन संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सदर बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते समीर देशमुख यांनी केले होते.
सविस्तर असे की दि. सहा डिसेंबर ला युवा संघर्ष यात्रा ही वर्धा जिल्ह्यात येणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने संजय शेटे रा. लातूर आणि उमेश पाटील रा. अमळनेर हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथे पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. त्या नंतर पुलगाव, वायफड, वर्धा, सेवाग्राम, पवनार, सेलू आणि हिंगणी पर्यंतचा पुर्ण पद यात्रेच्या मार्ग ची पाहणी करण्यात आली. सोबतच दुपारचा विसावा आणि रात्री चा मुक्काम करण्याची जागा निश्चित करण्यात आली. बैठकीला जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, अंबादास वानखेडे, आफताब खान, शरयू वांदिले, मुन्ना झाडे, पंकज घोडमारे, संदीप किटे, प्रा. खलील खतीब, मिलिंद हिवलेकर, संदीप भांडवलकर, नावेद शेख, प्रशांत कुत्तरमारे, गणेश कामनापुरे, अर्चीत निघडे, राहुल घोडे, संजय काकडे, प्रणय कदम, सचिन पारसडे, हरीश काळे, रामु पवार, संकेत निस्ताने, सचिन ठाकरे, रोशन राऊत, प्रज्वल धंदरे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.