Breaking
ब्रेकिंग

ढाब्यांवर भोजन नाही, तर दारुचा महापूर..! आरटीओच्या अधिकाऱ्यांचा जावईशोध : महाराष्ट्रात नेमकं चाललं तरी काय..?

2 4 7 1 7 6

सचिन धानकुटे

सेलू : – ढाब्यांवर भोजन नाही, तर चक्क दारू मिळत असल्याचा जावईशोध दस्तुरखुद्द आरटीओच्या अधिकाऱ्यांनीच लावला. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या साम्राज्यात नेमकं चाललं तरी काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

    आरटीओच्या वाहनातील कर्मचाऱ्याने भोजनासाठी थांबलेल्या वाहनधारकांना कारवाईच्या नावाखाली वेठीस धरून वसूली केल्याची घटना तालुक्यातील रमणा फाट्याजवळील एका ढाब्यावर शनिवार ता.१३ रोजी दुपारच्या सत्रात घडली. यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाची जनमानसात असलेली प्रतिमा सदर प्रकारामुळे चांगलीच अधोरेखित झाली. सदर घडलेल्या प्रकाराबाबत प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना सचित्र माहिती देण्यात आली. परंतु आठवडाभरा नंतरही आरटीओच्या अधिकाऱ्यांना साधी चौकशी तर सोडा, घटनास्थळी भेट देत घडलेल्या प्रकाराची माहिती घेण्याचे सौजन्य देखील दाखवता आले नाही. 

     याउलट सेलू तालुक्यातील ढाब्यांवर भोजन नाही तर दारुचा महापूर वाहत असल्याचा जावईशोध दस्तुरखुद्द आरटीओच्याच एका अधिकाऱ्यांनी लावला. त्यामुळे आरटीओचे अधिकारी आणि कर्मचारी ढाब्यांवर दारू ढोकसायला तर जात नाही ना..! असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. दारुबंदी असलेल्या जिल्ह्यातील ढाब्यावर जर अशाप्रकारे भोजनाऐवजी दारु मिळत असेल, तर राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी झोपा काढतात काय..? 

     एकंदरीतच आरटीओच्या अधिकाऱ्यांनी लावलेल्या “त्या” जावईशोधामुळे पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर देखील यानिमित्ताने सवाल उपस्थित केला आहे. राज्यातील परिवहन खात्याचे मंत्री दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यामुळे त्यांच्या राज्यात नेमकं चाललंय तरी काय, साहजिकच असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोयं.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 4 7 1 7 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे