Breaking
ब्रेकिंग

झडशीचा जयंत कोहळे होणार पीएसआय..! लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मारली बाजी 

1 9 7 0 2 2

सचिन धानकुटे

सेलू : – झडशी येथील जयंत राजू कोहळे ह्याने लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत बाजी मारत पीएसआय होण्याचे आपले स्वप्न साकार केले. त्याच्या या अभुतपुर्व यशानंतर स्थानिक मित्रमंडळी तसेच आप्तेष्टांनी त्याचे गावात मोठ्या जल्लोषात स्वागत केले.

   अराजपत्रित गट ब(पीएसआय) लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा निकाल नुकताच काल घोषित झाला. यात झडशी येथील जयंत राजू कोहळे याने बाजी मारत आपले पीएसआय होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले. जयंत हा झडशी येथील रहिवासी असून त्याने आपले प्राथमिक शिक्षण स्थानिक जिल्हा परिषद शाळेत तसेच उच्च माध्यमिक शिक्षण देखील गावातच पूर्ण केले. जयंतने अभियांत्रिकीची पदवी दत्ता मेघे इंजिनिअरिंग कॉलेज सावंगी(मेघे) येथून घेतली आहे. सहा महिन्याच्या खासगी नोकरीनंतर जयंतने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी सुरु केली. लोकसेवा आयोगाचा अभ्यास करताना त्याने कोणत्याही शिकवणी वर्गाचा आधार न घेता व मोठ्या शहरात न जाता आपल्या घरीच अभ्यास केला. याकरिता त्याला स्थानिक युवक सचिन खराबे व प्रफुल गेडाम यांच्याकडून शारीरिक शिक्षणाचे धडे मिळालेत. जयंतने जीवनात येणाऱ्या संकटावर मात करत सातत्यपूर्ण अभ्यासामुळेच त्याला लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादीत केले. दैनिक देशोन्नतीचे उपसंपादक राजू कोहळे व झडशी येथील अंगणवाडी सेविका संगिता कोहळे यांचा तो पाल्य आहे.

काल एमपीएससीच्या परीक्षेचा निकाल घोषित होताच मित्रमंडळीकडून ढोल ताशांच्या गजरात जयंतचे पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यात भूमिअभिलेख विभागात कार्यरत असलेले वाशिम येथील कृष्णकांत धाबे याचे सुद्धा जंगी स्वागत करण्यात आले. कृष्णकांत हा देखील या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे.

4/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे