Breaking
ब्रेकिंग

आरटीओच्या “त्या” हप्तावसूलीला प्रादेशिक परिवहन विभागाचा आशिर्वाद

2 6 9 1 2 5

सचिन धानकुटे

सेलू : – आरटीओच्या वाहनातील कर्मचाऱ्याने कारवाईच्या नावाखाली भोजनासाठी थांबलेल्या वाहनधारकांकडून अवैध वसूली केल्याची घटना रमणा फाट्याजवळील एका ढाब्यावर शनिवारी घडली. सदर प्रकार एका दक्ष नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद करताच हफ्तावसूली करणाऱ्या आरटीओच्या “त्या” कर्मचाऱ्याने वाहनांसह तेथून पोबारा केला. यासंदर्भात प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी मो. समीर मो. याकूब यांना माहिती दिली असता त्यांनी गेल्या चार दिवसांपासून कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही, त्यामुळे आरटीओच्या “त्या” हप्तावसूलीला एकप्रकारे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचा आशिर्वाद तर नाही ना..! असा प्रश्न उपस्थित होतो.

      रमणा फाट्याजवळील एका ढाब्यावर शनिवारी दुपारच्या सुमारास आरटीओचे एम एच ०४ केआर ६४३२ क्रमांकाचे स्कार्पिओ वाहन आडोश्याला थांबले होते. यावेळी त्या वाहनातील कर्मचाऱ्याने भोजनासाठी थांबलेल्या वाहनधारकांना कारवाईच्या नावाखाली बोलावून घेतले. त्याठिकाणी वाहनं ही केवळ थांबून होती हे विशेष..! यावेळी आरटीओच्या वाहनात चालकाच्या आसनावर विराजमान असलेल्या “त्या” वसूलीबाज कर्मचाऱ्यांने तेथील वाहनधारकांकडून कारवाईच्या नावाखाली रक्कम वसूल केली. ही बाब लक्षात येताच एका दक्ष नागरिकाने यासंदर्भातील प्रकार मोबाईलमध्ये कैद केला. तेव्हा कुठे त्या हप्ताखोराने आरटीओच्या वाहनांसह तेथून पोबारा केला. 

     सदर प्रकाराबाबत प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी मो. समीर मो. याकूब यांना सोमवारी अवगत करण्यात आले. यावेळी त्यांनी झालेल्या संपूर्ण प्रकाराची सचित्र माहिती घेतली आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी दर्पोक्ती दिली. परंतु गेल्या चार दिवसांपासून त्यांना त्या हप्ताखोराचा शोध घेता आला नाही हे विशेष..! कदाचित या हप्तावसूलीला त्यांचा तर आशिर्वाद नाही ना..! असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 9 1 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे