Breaking
ब्रेकिंग

श्री क्षेत्र उत्तरवाहिणी येथे आजपासून अखंड हरिनामासह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ

1 9 7 0 1 5

सचिन धानकुटे

सेलू : – नजिकच्या बेलगांव (धानोली) येथील शंकरधाम परिसरातील श्री क्षेत्र उत्तरवाहिणी येथे आज ता.६ गुरुवारपासून अखंड हरिनाम श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाला सुरुवात झाली. याप्रसंगी आळंदी (देवाची) येथील हभप गुरुवर्य पुंडलिकराव बोळवटकर महाराज आपल्या सुश्राव्य वाणीतून सप्ताहात भागवत कथा कथन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
श्री क्षेत्र उत्तरवाहिणी येथे संत ब्रम्हमुर्ती सद्गुरु लुंगेबाबा यांचा पुण्यतिथी सोहळा तसेच स्वानंद सुख निवासी श्री जोग महाराज यांचा पुण्यस्मरणोत्सवा निमित्ताने अखंड हरिनामासह श्रीमद भागवत सप्ताह दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आला असून हे एकविसावे वर्षे आहे. यानिमित्त आज येथे पहाटे कलश स्थापना करण्यात आली. त्यानंतर काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ यावेळेस भागवत कथा, मधल्या काळात भजने, सायंकाळी हरिपाठ व त्यानंतर नामसंकिर्तनाचा कार्यक्रम आयोजित आहे. यावेळी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपिठाचार्य हभप वाल्मिकदादा भोयर महाराज केळापूर, हभप शंकर महाराज टापरे शास्त्री वंधली, हभप ज्ञानेश्वर महाराज नन्नावरे जोगनगर, झुनका असतील तर भागवत कथे दरम्यान विणेकरी हभप पांडुरंग महाराज जगधरे, मृदंगाचार्य हभप भोजराज महाराज बावणे, तबलावादक हभप नामदेव महाराज जगधरे, हार्मोनियम हभप मुकेश महाराज आत्राम साथसंगत करणार आहे. यासोबतच गायक भजनी मंडळात सर्वश्री हभप अजय महाराज डेहणे, रुपदेव महाराज धोटे, चंद्रकांत महाराज डहाके, पंढरीनाथ महाराज उरकुडे, पुरुषोत्तम महाराज बावणे, नरहरी महाराज बोळवटकर, महेश महाराज चौधरी, सुर्यभान महाराज डोफेकर, दिलीप महाराज रोकडे, किशोर महाराज ठाकरे, दिगांबर महाराज ठाकरे यांचा समावेश आहे.
यानिमित्ताने मंगळवार ता. ११ रोजी दुपारी चार वाजता दिंडी सोहळा तर बुधवार ता. १२ रोजी सकाळी ११ वाजता हभप गुरुवर्य पुंडलिकराव बोळवटकर महाराज यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर दुपारपासून महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह काळात दररोज किर्तन तसेच विशेष कार्यक्रम, यासोबतच अनेक मान्यवरांसह हभप मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण सोहळा पार पडणार असल्याचे कळविण्यात आले. भाविकांना सदर स्थळावर जाण्यासाठी महाप्रसादाच्या दिवशी विनामूल्य वाहनांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. सदर सोहळ्याचा नागरिकांनी व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे