ब्रेकिंग
धावत्या मोटारसायकलला रानडुक्करांची धडक ; एकाचा मृत्यू
2
6
7
9
6
1
सचिन धानकुटे
वर्धा : – धावत्या मोटारसायकलला रानडुक्करांनी धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा-हिवरा रस्त्यावर घडली. एकनाथ भोंडे असे सदर अपघातातील मृतकाचे नाव आहे.
आजनसरा येथील प्रविण नासरे व एकनाथ भोंडे हे दोघेही एम एच ३४ बिएम ०३५२ क्रमांकाच्या मोटारसायकलने बोपापूर येथे प्रविणच्या आईवडिलांची भेट घेण्यासाठी गेले होते. तेथून दोघेही आजनसरा येथे परत येत असताना हिवरा ते आजनसरा दरम्यान त्यांच्या मोटारसायकलला चार रानडुक्करांनी धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. दरम्यान त्यांना उपचारासाठी वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी एकनाथचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी वडनेर पोलिसांत मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
2
6
7
9
6
1