Breaking
ब्रेकिंग

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात चालले तरी काय? वर्ध्यात प्रशिक्षण अधिकाऱ्याला निवासी उपजिल्हाधिकाऱ्याचा पदभार?

2 0 3 7 4 9

किशोर कारंजेकर 

वर्धा : वर्ध्यात अनेक कारणांमुळे चर्चेत राहणाऱ्या उपजिल्हाधिकारी मोरे यांच्या तडकाफड हकालपट्टी झाल्याने प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली होती. त्यांच्या अनेक कारणाम्याची चर्चा जिल्ह्यात झाली असताना ते वादग्रस्त अधिकारी देखील राहले असल्याचे बोलले गेले. मात्र आता हाच पदभार प्रशिक्षण अधिकारी यांच्या कडे देण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहे.

मागील काळात उपजिल्हाधिकारी मोरे यांनी शासकीय AC आपल्या बंगल्यावर नेल्याचा कारनामा केला असल्याची चर्चा होती.ही चर्चा विभागीय आयुक्त नागपूर पर्यंत गेली असताना निवासी उपजिल्हाधिकारी यांनी एकदा नव्हे तर दोन तीन वेळा शासकीय प्रोटोकॉल चुकविल्याच देखील बोललं गेलं! तलाठी व मंडळ अधिकारी लॅपटॉप खरेदी प्रकरणात घोटाळ्याची चर्चा अख्खा महाराष्ट्रभर गाजली असताना कोणतेही कारवाई त्यांच्यावर झाली नाही. यावर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.निवासी उपजिल्हाधिकारी हे पद जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचे असतांना अनुभवी अधिकाऱ्यांकडे देण्याची गरज असते आणि जिल्ह्यात अनेक अनुभवी उपजिल्हाधिकारी अधिकारी आहेत.परंतु तसे न करता प्रशिक्षण (Treaning Period) असणाऱ्या एका अधिकाऱ्याला देण्यात आल्याने जिल्ह्यात आगळ्यावेगळ्या चर्चेला चांगलाच मोठा उत आला आहे. हा अधिकारी शासकीय काम शिकत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.वर्धा जिल्हाचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा आहे.महायुती सरकारच्या काळात सध्या ते वर्धेचे पालकमंत्री आहे. त्यामुळे मागील काळात झालेल्या चुका पुन्हा तर होणार नाही ना? असा सवाल आता सर्वसामान्य जनता,शेतकरी,आणि शासकीय कार्यालयातील कर्मचारी करू लागले आहे.उपमुख्यमंत्री साहेब आता आपण जिल्ह्याकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज असल्याची कुचबुजच जिल्ह्यात सुरू झाली आहे.या अधिकाऱ्यांकडून शिपाई पदावर कार्यकरत असणाऱ्या कर्मचारी यांना अधिकारी पावर दाखविणे दोन दिवसात सुरु झाल्याने कार्यालयातील सगळा कर्मचारी वर्ग दोन दिवसांपासून नाराज आहे. आपली व्यथा कोणाकडे मांडावी असा सवाल उपस्थित झाला आहे.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 3 7 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे