प्रयागराज येथील समाधीस्थळी संत केजाजी महाराजांचा महानिर्वाण दिन साजरा
सचिन धानकुटे
सेलू : – विदर्भाची प्रतीपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र घोराड येथील संत केजाजी महाराजांचा महानिर्वाण दिन प्रयागराज येथील समाधीस्थळी भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
येथील श्री संत केजाजी महाराज मकरसंक्रांतीला आयोजित कुंभमेळ्याला प्रयागराज येथे गेले असता तिथे १४ जानेवारी १९०७ ला त्यांनी तिथे देह ठेवला. दारागंज येथे गंगानदीच्या तिरावर भोसले वाड्यात त्यांची समाधी आहे. तिथे पुजारी असून दररोज पूजाअर्चा केली जाते. आज त्यांची ११७ वी पुण्यतिथी आहे. घोराडमध्ये संत केजाजी महाराजांची पुण्यतिथी उत्साहाने साजरी केली जाते. काल ९ फेब्रुवारीला महाराजांचा महानिर्वाण दिवशी प्रयागराज येथे येथील भाविकांनी समाधीचे दर्शन घेत महानिर्वाण दिवस साजरा केला. यावेळी स्थानिक पुजार्यांच्या उपस्थितीत समाधी पुजन आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी मंदीराचे पुजारी दिनकर जोशी, दामोधर जोशी, घोराड येथील सुरेंद्र राऊत, संजय धोंगडे, राजू नारायण वरटकर, संजय वरटकर, कवडू सुरसे, गजानन ढोले, पंकज तडस, हरिहर ढोले, संतोष तडस, दिलीप गव्हाळे, विनोद सलाम आदी भाविक उपस्थित होते.