वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. खुशाल पठाडे उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित

सचिन धानकुटे
सेलू : – स्थानिक डॉ. आर. जी. भोयर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. खुशाल पठाडे यांना नुकतेच उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वनस्पती शास्त्रातील उत्कृष्ट शिक्षक तसेच संशोधन कार्यासाठी त्यांना विशाखापट्टणम येथील आंतरराष्ट्रीय गुरु प्रतिभा पुरस्कार समारंभात गौरविण्यात आले.
डॉ. खुशाल पठाडे येथील डॉ आर जी भोयर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वनस्पती शास्त्राचे विभाग प्रमुख असून ते महाविद्यालयाचे नियमित प्राध्यापक आहे. सुमारे १२ वर्षांपासून ते शिक्षक तसेच संशोधक म्हणून काम करीत आहे. विशेष म्हणजे त्यांचे ३५ संशोधन निबंध विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकांमध्ये प्रकाशित झाले आहे. त्यांच्या नावे दोन आंतरराष्ट्रीय व आठ राष्ट्रीय पेटेन्ट देखील प्रकाशित आहे. यासोबतच पाच संशोधन पुस्तके प्रकाशित असून दोन पुस्तकांमधील संशोधनपर प्रकरणे प्रकाशित झालेले आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंती व शिक्षक दिनाच्या प्रसंगावर आंतरराष्ट्रीय गुरु प्रतिभा पुरस्कार समारंभात सिदवी फाऊंडेशन तर्फे डॉ खुशाल पठाडे यांना उत्कृष्ट शिक्षक सम्मान ता.२ सप्टेंबर रोजी आंध्र विश्वविद्यालय, विशाखापट्टणम येथे प्रदान करण्यात आला. शिक्षक दिनाच्या औचित्यावर त्यांचा विद्याभारती संस्थेच्या वतीने देखील नुकताच उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी विद्याभारती संस्थेचे अध्यक्ष डॉ आर जी भोयर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय कानोडे तसेच त्यांचे सहकारी डॉ आशिष टिपले, डॉ अभिजीत पाटील, डॉ वैभव पिंपळे व समस्त कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.