दक्षिण क्षेत्रीय जलतरण स्पर्धेत Channawar’s e Vidya Mandir च्या ईशा पुजारीला कास्यपदक
वर्धा : Channawar’s e Vidya Mandir ची विद्यार्थिनी ईशा पुजारी हिने दक्षिण क्षेत्रीय (South Zonal) जलतरण स्पर्धेत कास्यपदक प्राप्त केले आहे. ईशाने प्राप्त केलेले हे यश वर्धा जिल्ह्याकरिता अभिमानाची बाब समजली जात आहे.
30 ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत पी. एस. शिव शंकराप्पा इंग्लिश मीडियम रेसिडेन्शियल स्कूल शिव गंगोत्री देवगिरी बंगलोर येथे CBSE द्वारा हि दक्षिण क्षेत्रीय (South Zonal) जलतरण स्पर्धा घेण्यात आली होती.
स्पर्धेत चन्नावार्स ई विद्यामंदिरची विद्यार्थिनी ईशा अमित पुजारी (वर्ग नववा) हिने या स्पर्धेत सहभाग नोंदवून 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारात कास्यपदक प्राप्त केले. या स्पर्धेत पदक प्राप्त करणारी नागपूर विभागातील ईशा ही एकमेव जलतरणपटु आहे.
स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू व आंध्रप्रदेश या राज्यातील मुलींनी सहभाग नोंदवला होता. तसेच 50 मीटर, 100 मीटर व दोनशे मीटर ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारात नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करीत शालेय जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट असा सहभाग नोंदविला. तिने क्षेत्रीय शालेय जलतरण स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा आपला सहभाग नोंदविला आहे.
यापूर्वी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ईशा पुजारीने पन्नास मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये सुवर्णपदक आणि शंभर मीटर आणि 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये रौप्यपदक मिळवले आहे.
हे यश ईशा पुजारीच्या तीन वर्षाच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे आहे. त्याबद्दल तिचे शाळेकडून आणि सर्वच स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे. तीने आपल्या यशाचे श्रेय आपले पालक डॉ. अंजली पुजारी, डॉ. अमित पुजारी, प्रशिक्षक रंजना वानखेडे, तसेच चन्नावार्स ई विद्या मंदिरचे संस्थापक दिनेश चन्नावार, शाळेच्या प्राचार्या अपूर्वा पांडे व शाळेतील सर्व शिक्षकांना दिले आहे.