हिंगणीचा सट्टा व्यावसायिक “आकाश” गजाआड ; क्राईम इंटेलिजन्स पथकाची कारवाई

सचिन धानकुटे
सेलू (ता.२२) : – पोलीस अधीक्षकांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकाने आज हिंगणी येथील सट्टा व्यावसायिकास ताब्यात घेत त्याच्याकडून १ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आकाश किशोर महाडोळे (वय३०) रा. वार्ड क्रमांक ५, हिंगणी असे त्या सट्टापट्टी व्यावसायिकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक यांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकाला हिंगणी येथील एका घरात सट्टापट्टीचा व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार क्राईम इंटेलिजन्स पथकाने हिंगणी येथील “त्या” घरी दस्तक देताच आकाश महाडोळे ह्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सट्टा व्यवसायाशी संबंधित असे ८५ हजार ८० रुपये तसेच विवो कंपनीचे ३५ हजार रुपयांचे दोन अँड्रॉइड मोबाईल असा एकूण १ लाख २० हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आकाश महाडोळे याच्या विरोधात सेलू पोलिसांत महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून त्याला पुढील कार्यवाहीसाठी सेलू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर रतनकुमार कवडे यांच्या मार्गदर्शनात क्राईम इंटेलिजन्स पथकाचे प्रमुख संदीप कापडे, पोलीस अंमलदार रोशन निंबाळकर, सागर भोसले, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, धिरज राठोड, राकेश इतवारे, पवन देशमुख, अभिषेक नाईक, हर्षल सोनटक्के, शिरीन शेख, प्रफुल्ल वानखेडे आदि क्राईम इंटेलिजन्स पथकाच्या कर्मचाऱ्यांनी केली.