ब्रेकिंग
वाघाच्या हल्ल्यात वासराचा बळी : रिधोरा परिसरात भितीचे वातावरण

1
2
8
4
4
9
सचिन धानकुटे
सेलू : – वाघाच्या हल्ल्यात वासराचा फडशा पडल्याची घटना तालुक्यातील रिधोरा येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात शेतकऱ्याचे विस हजार रुपयांचे नुकसान झाले असून वनविभागाकडून मदतीची गरज व्यक्त होत आहे.
रिधोरा येथील भिमराव खैरकार यांचे गावालगतच शेत असून शेतात जनावरांसाठीचा गोठा आहे. याच गोठ्यातील दिड वर्षाच्या गायीच्या वासरावर काल रात्री वाघाने हल्ला चढवित त्याचा फडशा पाडला. ही बाब आज सकाळी उघडकीस येताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी आडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा देखील केला. याआधीही येथे वाघाने जनावरांना आपले भक्ष्य बनवले होते हे विशेष.. शेतकऱ्याचे यात जवळपास विस हजार रुपयांचे नुकसान झाले असून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
1
2
8
4
4
9