देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला नर्सिंग कॉलेजचा परिसर ; देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
सेलू : – केळझर येथील नर्सिंग कॉलेजच्या कॅम्पसमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अख्खा कॉलेज परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला.
प्रगतीशील बहुउद्देशिय संस्था वाशीम द्वारा संचालित केळझर येथील सुनिता नर्सिंगच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनी “एक शाम देश के शहिदों के नाम” देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सकाळच्या सत्रात जवाहर नवोदय विद्यालय गोंदिया येथील सेवानिवृत्त प्राचार्य डी एस थूल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला सेवानिवृत्त अभियंता हेमराज रामटेके, प्रगतीशील बहुउद्देशिय संस्थेचे सचिव नरेंद्र सुर्यवंशी, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सागर सिरसाट, अक्षय जगताप, एजंल पँराडाईज इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापक शितल सोनटक्के, सुनिता नर्सिंगच्या प्राचार्य प्रियंका भुते प्रामुख्याने उपस्थित होते. सायंकाळच्या सत्रात आयोजित देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद लाखे, साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटंबकार, सरपंच अर्चना लोणकर, माजी सरपंच फारुख शेख, पत्रकार भारत घवघवे आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी नागपूर येथील लुईस फर्नांडो आणि अमित कुमार यांच्या आर्केस्ट्रा संचाने मंत्रमुग्ध करणाऱ्या देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रेहकी येथील सक्षम धानकुटे नामक बालकलाकाराने देखील यावेळी “दमा दम मस्त कलंदर” आणि “चढता सूरज” कव्वाली सादर करीत प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमाला फार्मसी आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसह स्थानिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.