धक्कादायक..धक्कादायक… नराधमाचे गायीशी अनैसर्गिक कृत्य : वर्ध्यात विकृत मानसिकतेचा कळस
किशोर कारंजेकर
वर्धा : – एका नराधमाने गायीलाच आपल्या वासनेची शिकार केल्याचा धक्कादायक असा किळसवाणा प्रकार शहरातील ठाकरे मार्केट परिसरात आज शुक्रवारी घडला. याप्रकरणी तक्रारीनंतर शहर पोलिसांनी आरोपी नराधमा विरोधात गुन्हा दाखल करीत त्यास अटक केली.
शहरातील ठाकरे मार्केट परिसरातील मोकळ्या मैदानात मोकाट जनावरांचा ठीय्या असतो. याठिकाणी असलेल्या जनावरांशी आरोपी नराधम नेहमीच अनैतिक कृत्य करायचां. आज शुक्रवारी ही बाब लक्षात येताच यासंदर्भात एकाने व्हिडीओ तयार करून तो समाजमाध्यमात व्हायरल केला. यात तो नराधम गायीशी अनैसर्गिक कृत्य करीत असल्याचे दिसून आले. सदर व्हिडीओची तत्काळ दखल घेत पिपल्स फॉर अँनिमल्सने याप्रकरणी प्राणीमित्रांना अवगत केले. माजी खासदार मेनका गांधी ह्यांनी तत्काळ याविषयी पोलीस अधीक्षकांशी संवाद साधल्यानंतर याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपी नराधमास पोलिसांनी अटक देखील केली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करीत आहे.