जुगारअड्डयावर छापा : चौघांना अटक ; सेलू पोलिसांची कारवाई
सचिन धानकुटे
सेलू : – पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या चौघांना ताब्यात घेत १ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रेहकी येथे मंगळवारी सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास पोलिसांनी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, रेहकी येथील देवीच्या मंदिर परिसरात नियमित जुगार भरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास त्याठिकाणी धाड टाकली असता चौघांना जुगार खेळताना अटक करण्यात आली. यात दिपक झाडे(वय३२), सतिश इवनाथे(वय३१), सुनिल झाडे(वय२९), भुषण धानकुटे(वय२९) सर्व राहणार रेहकी यांचा समावेश आहे. यावेळी पोलिसांनी जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे ताशपत्ते तसेच १ हजार ९५० रुपयांची रोख रक्कम जप्त केली. याप्रकरणी त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत तुषार भुते, गणेश राऊत, देवा वनवे आदि कर्मचाऱ्यांनी केली.