२६ जानेवारीला केळझर येथे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम ; प्रगतीशील बहुउद्देशिय संस्थेचे आयोजन
सचिन धानकुटे
सेलू (ता.२५) : – प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या शुक्रवारी तालुक्यातील केळझर येथे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
प्रगतीशील बहुउद्देशिय संस्था वाशीम द्वारा संचालित केळझर येथील सुनिता नर्सिंगच्या प्रांगणात उद्या शुक्रवारी सायंकाळी सहा ते दहा यावेळेस “एक शाम देश के शहिदों के नाम” हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केळझर येथील ग्रामपंचायत कमेटी, विष्णू स्पोर्टिंग क्लब, ऋषी आदिवासी क्रीडा मंडळ, मित्र परिवार स्पोर्टिंग क्लब, स्वातंत्र्य स्पोर्टिंग क्लब, साईबाबा स्पोर्टिंग क्लब तसेच राणी दुर्गावती स्पोर्टिंग क्लबच्या सहयोगाने विशेषतः सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या देशप्रेमी मंडळीनी आपल्या समवेत येतांना उंच असा तिरंगा ध्वज सोबत आणावा, असे आवाहन प्रगतीशील बहुउद्देशिय संस्थेचे सचिव नरेंद्र सुर्यवंशी यांनी केले.