सेवाग्राम येथे अभिनववाडी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात
सचिन धानकुटे
वर्धा : – अभिनव भारत फाउंडेशनच्या सेवाग्राम येथील अभिनववाडी या पहिल्या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
याप्रसंगी अभिनव भारत फाउंडेशनचे जिल्हा व तालुका समन्वयक तसेच महिला कर्मचाऱ्यांनी कुदळ मारत भूमिपूजन केले. यावेळी अभिनव भारत फाऊंडेशचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराग वांदिले यांनी प्रकल्पाबद्दल उपस्थित महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले. व्यवस्थापक सचिन पाटील यांनी यावेळी अभिनव भारत फाउंडेशनच्या आगामी प्रोजेक्ट आणि स्वयंसेविका भरती अभियानाबाबत महिलांना माहिती दिली. त्यानंतर नई तालीम बापू कुटी सेवाग्राम आश्रमात संस्थेची सभा पार पडली. यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्वयंसेविकांची पहिली यादी जाहीर करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सदर उपक्रमामुळे जिल्ह्यातील हजारो महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमाला पुजा गिरडे, प्रिती वासनिक, विजया तेलरांधे, जयश्री फंदे , दुर्गा बावणे, सुरेखा पंधरे, वर्षा बारई, जयश्री ढोंगे, प्रतिमा देशभ्रतार, दिपाली कौरती, आरती मुते, रेखा कावडकर, सूर्यकांता चव्हाण, राखी बोभाटे, सोनाली नाईक, शुभांगी बिडकर आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.