वर्ध्यातील रणरागिणींनी रचली लेडीज क्लबची मुहूर्तमेढ, महिलांचा महिलांसाठी धाडसी निर्णय : महिलांचा विकास आणि प्रगती काळाची गरज – इरम हसन
सचिन धानकुटे
वर्धा : – जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर उच्चशिक्षित, ध्येयवादी अशा सहा रणरागिणींनी खास महिलांसाठी लेडीज क्लब नामक व्यासपीठाची मुहूर्तमेढ रोवली. यामध्ये प्रेरणा गौरव व्यास, रोहिणी मोरेश काशीकर, कुंतल कौस्तुभ कठाणे, प्रिया कपिल चांडक, रुपल श्रीकांत काशीकर व रुचिका पियुष ठक्कर अशा सहा मैत्रिणींचा समावेश आहे.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इरम नुरुल हसन तर प्रमुख वक्ता म्हणून शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ प्रविणा जैन प्रामुख्याने उपस्थित होत्या. आपल्याकडील ज्ञान स्वतःपूरतेच मर्यादित न ठेवता विशेषतः समाजातील महिलांसाठी काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी या लेडीज क्लबची स्थापना केली. महिलांचा विकास आणि प्रगती ही काळाची गरज आहे. ज्यामुळे आपण सृजनशील, समृद्ध व संपन्न असा समाज घडवू शकतो, असे प्रतिपादन यावेळी इरम नुरुल हसन यांनी व्यक्त केले. यासोबतच डॉ प्रविणा जैन यांनी महिलांच्या आजाराबाबत तसेच सर्वाइकल कॅन्सर संदर्भात माहिती देत महिलांमध्ये जागरूकता निर्माण केली. लेडीज क्लबची स्थापना होताच त्यात जवळपास ९५ सदस्य सहभागी झालेत. दरम्यान प्रत्येक सहभागी सदस्याला यावेळी सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात देखील आले.