Breaking
ब्रेकिंग

धक्कादायक..! पासबुकात धनादेशाची नोंद मात्र रक्कम गेली भलत्याचं खात्यात, बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील प्रकार

बचत खात्यातील रक्कम सीसी खात्यात न जाता चक्क त्रयस्थ खात्यात गेल्याने महिला संभ्रमात

1 9 7 0 9 1

आरएनएन EXCLUSIVE

सेलू : – सध्याच्या डीजीटल काळात दररोज नवनवीन असे धक्कादायक प्रकार घडताना दिसतात. असाच काहीसा प्रकार येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत घडल्याने बचत गटाच्या महिला संभ्रमात पडल्या आहेत. पासबुकात नोंद झालेल्या धनादेशाची रक्कम चक्क भलत्याचं खात्यात वळती झाल्याने बचत गटाच्या महिलांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

रेहकी येथील त्रिवेणी स्वंय सहायता महिला बचत गटाचे स्थानिक बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बचत आणी सीसी खाते आहे. याच बचत खात्यातील रक्कम सीसी खात्यात वळती करण्यासाठी त्यांनी ता.२८ ऑगस्ट २०२३ रोजी ४२५०० रुपयांचा एक धनादेश बँकेत जमा केला. यासंदर्भात त्यांच्या बँक पासबुकात तशी नोंद देखील करण्यात आली. परंतु दोन महिन्यानंतरही सदर रक्कम सीसी खात्यात जमा न झाल्याने त्या महिला चौकशीसाठी बँकेच्या शाखेत गेल्यात. यावेळी त्यांना सदर रक्कम अनावधानाने भलत्याचं खात्यात वळती झाल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. तेव्हापासून तर आजतागायत “त्या” महिला आपल्या खात्यातील पैशासाठी बँकेचे उंबरठे झिजवत आहेत.
यासंदर्भात बँक ऑफ इंडियाचे शाखा प्रबंधक एम एल कंवर यांनी बँकेच्या कर्मचाऱ्याकडून व्हेरिफिकेशन मध्ये चूक झाल्याचे मान्य करीत आम्ही सहा महिन्यांपासून सदर रक्कम बचत गटाच्या खात्यात परत आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. दरम्यान त्यांनी सदर ४२५०० रुपयांची रक्कम ही सेलू येथीलच परंतु सद्यस्थितीत सिंदी(रेल्वे) येथे वास्तव्यास असलेल्या सागर तेजाराम पाटील व चंद्रकला मारोतराव तडस नामक महिलेच्या संयुक्त अशा बँक खात्यात वळती झाल्याचेही सांगितले. सदर रक्कम ज्यादिवशी खात्यात जमा झाली, अगदी त्याच दिवशी सिंदी(रेल्वे) येथील एका एटीएममधून सतत तीन दिवस दहा-दहा हजार रुपये असे तीस हजार रुपये काढून घेण्यात आले. हा प्रकार जेव्हा बँकेच्या निदर्शनास आला, तेव्हा त्यांनी संबंधित खाते गोठवून रक्कम परत करण्यासाठी आटापिटा सुरू केला. यातील महिलेने त्या संयुक्त खात्याचे एटीएम माझ्याकडे नसल्याचे बँकेला लिखित स्वरूपात कळविले आहे, तर दुसरीकडे सागर पाटील ह्याने मी ती रक्कम घेतली नसून बँकेच्या अधिकाऱ्यांना परत करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे यावेळी सांगितले. एकंदरीतच या प्रकारात बचत गटाच्या शेतमजूर महिला मात्र नाहक भरडल्या जात असून त्यांना सध्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने संभ्रमात अडकल्या आहेत.

बँक ऑफ इंडियाच्या शाखेत याआधीही घडला असा प्रकार

येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत याआधी देखील असाच प्रकार घडला आहे. विधवा महिलेच्या घरकुलाचे पैसे तीच्या खात्यात जमा न करता कारंजा येथील ह्याच बँकेच्या एका खात्यात जमा करण्यात आले होते. शेवटी ते पैसे परत तर आले, परंतु त्यासाठी करावा लागणारा आटापिटा बँक प्रशासन सध्या तरी विसरल्याचे दिसून येते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 9 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे