Breaking
ब्रेकिंग

सिंदी (रेल्वे)ला तालुक्याचा दर्जा द्या, अन्यथा लोकसभासह विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार

समुद्रपुर आणि सेलू तालुक्यातील गावांना जोडून दिला तालुका निर्मितीचा प्रस्ताव ; स्थानिकांचा पालकमंत्री, खासदार, आमदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर

2 0 7 3 9 2

सचिन धानकुटे

सेलू : – तालुक्यातील सिंदी(रेल्वे) शहरात क-वर्ग नगरपरिषद असून छोट्या-छोट्या कामासाठी सेलू येथील तहसील कार्यालयात स्थानिकांना जावे लागते. सिंदी शहरात औद्योगिक वसाहत अथवा कोणत्याही प्रकारचा उद्योग नसल्याने शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, याकरिता सिंदीला तालुक्याचा दर्जा द्यावा अन्यथा येणाऱ्या लोकसभासह विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा सर्वपक्षीय तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने नुकताच निवेदनातून देण्यात आला.

          सिंदी शहराला तालुक्याचा दर्जा देण्यासाठी सन २००८ मध्ये व २०१५ मध्ये शासनाकडे प्रस्ताव पाठवून लोकप्रतिनिधींच्या मार्फत मागणी करण्यात आली होती, परंतु अद्यापही तालुक्याचा दर्जा न मिळाल्याने आणि नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवीन तालुके निर्मितीचे घोषणा केल्याने बनणाऱ्या नवीन तहसीलमध्ये सिंदीचा समावेश करावा. याकरिता सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत तालुका निर्मिती कृती समिती स्थापन केली. सदर समितीच्या वतीने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार समिर कुणावार, आमदार रामदास आंबटकर, जिल्हाधिकारी यांना सिंदी तालुका निर्मितीचे निवेदन देण्यात आले.    

    यावेळी सिंदी(रेल्वे) तालुका निर्मिती कृती समितीचे भाजपचे ओमप्रकाश राठी, काँग्रेसचे प्रकाशचंद्र डफ, राष्ट्रवादीचे गंगाधर कलोडे, शिवसेनेचे सचिन लांबट, पळसगांवचे सरपंच धीरज लेंडे, दिग्रसचे सरपंच मनोज तिमांडे, हेलोडीचे सरपंच सागर भगत, स्नेहल कलोडे, अमोल गवळी, पंकज झाडे, किशोर सोनटक्के, अमोल सोनटक्के, अशोक चि. कलोडे, मोहम्मद इकबाल, आशिष देवतळे, मोहम्मद इमरान यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 7 3 9 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे