वर्धा तालुका सहकारी खरेदी विक्री समिती सभापतीपदी पंकज घोडमारे तर उपसभापती पदी संदिप राऊत
वर्धा : वर्धा तालुका सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित, वर्धाच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक आज संपन्न झाली. यात सभापती पदी पंकज घोडमारे तर उपसभापती पदी संदिप राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आज वर्धा तालुका सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित, वर्धा च्या कार्यालयात निवडणूक अधिकारी अजय वाहने यांच्या अध्यक्षतेत सभापती व उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. 28 ऑक्टोबर ला वर्धा तालुका सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित, वर्धा ची निवडणूक संपन्न झाली. यात सात पदा करीता मतदान झाले तर या आगोदर सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. सदर निवडणुकीत आमदार रणजित कांबळे यांना चौदा पैकी फक्त तिन उमेदवार मिळाले आणि त्या तिघांचा मोठ्या फरकाने पराभव करत सहकार पॅनल चे सर्व उमेदवार विजयी झाले होते. या विजयामुळे सहकार गटात आनंदाचे वातावरण असून ही आमच्या सर्वांसाठी उत्साह वाढवणारी बाब आहे, असे मत समीर देशमुख यांनी व्यक्त केले.
माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांनी नवनियुक्त सभापती आणि उपसभापती चे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. या प्रसंगी बाबाराव झळके, शरद देशमुख, संजय कामनापुरे, अमोल कसनारे, अंबादास वानखेडे, संचालक सुरेश खंडागळे, भाऊरावजी मगर, पुष्पा येंगडे, स्वाती लांबट, अनिल ठाकरे, संकेत निस्ताने, संदीप भांडवलकर, रमेश गायकवाड, सूरज गोहो, संतोष बोरकुटे, राहुल घोडे, अर्चीत निघडे, संजय काकडे, विनोद पांडे उपस्थित होते.