आनंददायी बातमी : सुनील गफाट पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी
किशोर कारंजेकर
वर्धा : तत्कालीन जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सामान्य कार्यकर्ता असलेल्या सुनील गफाट यांची जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. जुन्या जिल्हाध्यक्षचा कार्यकाळ समपल्याने सुनील गफाट यांच्याकडे पुन्हा वर्धा जिल्हा भारतीय जनता पार्टीची सूत्र दिली आहेत.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार 19 जुलै रोजी राज्यातील भाजपा जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून जिल्हाध्यक्ष म्हणून भाजपाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष गफाट यांची वर्णी लागली आहे.
भारतीय जनता पार्टीत कार्यकर्ता म्हणून असलेल्या गफाट जिल्हा सरचिटणीस होते. संघटनेत काम करत असतानाच डॉ. गोडे यांचा कार्यकाळ पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. वयाने लहान असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या मात्र गेल्या दीड वर्षात जिल्हाध्यक्षपदाला न्याय दिल्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी गफाट यांना पुन्हा भाजपाची जबाबदारी दिली. आगामी स्थानिक स्वराज्य समित्यांच्या निवडणूक मोठे आव्हान, विधानसभा निवडणुकीतील इच्छुकांची मन सांभाळून त्यांना काम करावे लागणार आहे. त्यांच्या निवडीचे खा. रामदास तडस, वर्धा लोकसभा प्रभारी सुमित वानखेडे, आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार, आ. डॉ. रामदास आंबटकर, आ. डॉ. पंकज भोयर, अविनाश देव, किशोर दिघे, राजेश बकाने आदींनी अभिनंदन केले.