हिंगणीच्या यशवंत विद्यालयाचे कला, क्रीडा, सांस्कृतिक व गायन स्पर्धेत घवघवीत यश
सचिन धानकुटे
सेलू : – हिंगणी येथील यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या कला, क्रीडा, सांस्कृतिक व गायन स्पर्धेत घवघवीत यश संपादित केले.
लोकनेते माजी आमदार तथा पणन महासंघाचे संचालक प्राध्यापक सुरेशभाऊ देशमुख अमृत महोत्सव कृतज्ञता वर्ष २०२३-२४ च्या निमित्ताने वर्ध्याच्या यशवंत महाविद्यालयात ता. ९, १० व ११ जानेवारीला आयोजित अंतिम स्पर्धेत हिंगणी येथील यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा, सांस्कृतीक व गायन या प्रकारात मोठे यश संपादित केले. गीतगायन स्पर्धेत आचल मुडे हिने प्रथम तर समूह गायनात आचल मुडे, अंकीता ढोले, पुसदकर, पाटील, धानिसकर, लांडगे, अवघडे आदि विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रथम क्रमांक पटकावला. एकल नृत्यात वैष्णवी ईखार हिने तिसरा क्रमांक पटकावला. क्रीडा स्पर्धेत क्रॉस कंट्रीमध्ये कुणाल कैलास श्रीनाथे या विद्यार्थ्याने प्रथम, अर्जुन अनंता आदे ह्याने द्वितीय तर मनीष कोल्हे या विद्यार्थ्यांने पाचवा क्रमांक पटकावला. मुलींमधून क्रॉस कंट्री स्पर्धेत सुहानी सुधाकर नेहारे या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक पटकावला. मिळवला. कबड्डीच्या १७ वर्षे वयोगटातील सामन्यात मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावल्या बद्दल सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख, उपाध्यक्ष सतीश राऊत तथा सर्व संचालक मंडळ, शाळेच्या मुख्याध्यापिका गोरडे मॅडम, पर्यवेक्षक फासगे सर क्रीडा शिक्षक दिलीप गावंडे, इंगोले सर, लोहकरे सर, मालेवार मॅडम, गोसावी मॅडम, ढुमणे सर, ढवळे सर, मयूर देवढे, सतीश तेलरांधे तथा शाळेतील समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.