Breaking
ब्रेकिंग

विदर्भातील डिजिटल पत्रकार कृषी अभ्यास दौऱ्यावर.. जळगांवसाठी नागपूरातून ४० जणांची टिम रवाना

1 6 9 6 3 0

आरएनएन न्युज नेटवर्क

नागपूर ता. २९ : – विदर्भातील डिजिटल पत्रकारांच्या ४० जणांच्या चमूने आज नागपूरहून जळगांवकडे जाणाऱ्या कृषी अभ्यास दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्यात विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकार सहभागी झाले आहेत.

   या दौऱ्यात पत्रकार मंडळी जळगांव येथील जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. येथील जैन हिल्सच्या शेती संशोधन प्रात्याक्षिक केंद्राला भेट देणार आहेत. या केंद्रावर शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन सुरू आहे. यात भविष्यातील शेती(फ्युचर फार्मिंग), मातीरहीत मिडीयामध्ये शेती, हार्ड्रोपोनिक, एरोपोनिक फार्मिंग, टिश्यूकल्चर तंत्रज्ञान, जगातील प्रथम क्रमांकाची अत्याधुनिक बायोटेक लॅबसह अन्य प्रकल्प समजून घेण्यासाठी विशेषतः या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

    या दौऱ्यात सहभागी होणाऱ्या पत्रकारांमध्ये प्रतिक साबळे, दिलीप घोरमारे, अनुप पठाणे, विलास गोंदोळे, किशोर कारंजेकर, आशिष धापुडकर, सचिन धानकुटे, संजय धोंगडे, गणेश शेंडे, राजू डोंगरे, दिनेश लायचा, राजेंद्र निमसटकर, शेख दिलदार शेख सिकंदर, प्रशांत चंदनखेडे, सचिन मेश्राम, अनंता गोवर्धन, सुलेमान बेग, गोपाल कडुकर, प्रफुल्ल उरकुडे, आनंद आंबेकर, देवनाथ गंडाटे, राजेंद्र उट्टलवार, सनी भोंगाडे, सुरेश डांगे, शेखर गजभिये, नत्थू रामेलवार, कवीश्वर खडसे, संदीप गौरखेडे, अनिलसिंग चव्हाण, अनुप भोपळे आणि रुपेश वणवे आदि पत्रकारांचा समावेश आहे.

     सदर दौऱ्यामुळे पत्रकारांना कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाची माहिती मिळेल आणि या माहितीचा वापर करून ते शेतकऱ्यांना कृषी व्यवसायात यशस्वी होण्यासाठी मदत करू शकतील.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 6 9 6 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे