संत नानाजी महाराज विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सचिन धानकुटे
सेलू : – सुरगांव येथील संत नानाजी महाराज विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच शाळा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह शाळेचे आजी माजी मुख्याध्यापक व शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.
सुरगांव येथील संत नानाजी महाराज विद्यालयाचा माध्यमिक शालान्त परिक्षेचा निकाल यावर्षी ८१.२० टक्के लागला. यात शाळेतील कोयल उपाध्याय हीने ८२.२० टक्के गुण घेत प्रथम क्रमांक पटकावला तर पुनम खडसे हीने ७३ टक्के गुण घेत द्वितीय, समीर डंभारे याने ६८ टक्के गुण घेत तृतीय तर काजल गायकवाड हीने ६५ टक्के गुण घेऊन चतुर्थ क्रमांक पटकावला. याप्रसंगी शाळा प्रशासनाच्या वतीने चारही विद्यार्थ्यांचे माजी मुख्याध्यापिका अमिता खोडके यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक शिरपूरकर सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.