दिव्यांग बहिणभावाला गणवेश भेट ; आमदार बच्चू भाऊंच्या वाढदिवसानिमित्त प्रहार अपंग क्रांती संघटनेचा उपक्रम
सचिन धानकुटे
सेलू : – दिव्यांगासाठी दैवतासमान असलेल्या आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रहार अपंग क्राती संघटनेच्या वतीने दिव्यांग बहिणभावास गणवेश भेट देण्यात आला.
प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या परिवारातील सदस्य असलेल्या येथील महेक व अल्तमश रफीक शेख नामक बहिणभावास गणवेश आणि मिठाई भेट स्वरूपात देण्यात आली. बुधवार ता.५ जुलै रोजी आमदार बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस होता. यानिमित्ताने प्रहार संघटनेच्या वतीने दरवर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. गेल्या वेळी वृक्षारोपण करीत वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दिव्यांग बहिणभावास गणवेश भेट देण्यात आला आणि त्यांचा यथोचित सन्मान देखील करण्यात आला.
याप्रसंगी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे सेलू तालुका अध्यक्ष सुनिल मिश्रा, केळझर शाखा अध्यक्ष बजरंग शेंदरे, ललित शेंडे, उमेश पराते, गजानन बोकडे, शारीक पठाण, अनिल बोकडे, तेजस मांढरे, प्रशांत तडस, संतोष रणदिवे, गजू रामचंद्र बोकडे यांच्यासह दिव्यांग बांधव व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.