Breaking
ब्रेकिंग

मोटारसायकलची सुरक्षा कठड्याला धडक ; वाहनचालक गंभीर जखमी ; कान्हापूर नजिकचा खड्डा ठरतोय जीवघेणा

1 9 7 0 6 7

सचिन धानकुटे

सेलू : – रस्ता बांधकामाच्या सुरक्षा कठड्यावर मोटारसायकल धडकल्याने चालक गंभीर जखमी झाल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास कान्हापूर जवळ घडली. जखमी चालकास आधी सेवाग्राम व त्यानंतर नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. यावेळी जखमीच्या खिशात आढळलेल्या आधार कार्डानुसार प्रदिप दिलीप बावणे रा. मोहगांव झिल्पी ता. हिंगणा अशी जखमीची ओळख असल्याचे सांगितले जाते.

  कान्हापूर जवळच्या महामार्गावर रस्ता खोदकाम करण्यात आल्याने बऱ्याच दिवसांपासून सुरक्षा कठडे आणि प्लास्टिक पन्नी लावून ठेवण्यात आली आहे. वाहनधारकांना दिवसा याचा सहज अंदाज येतो, परंतु रात्रीच्या अंधारात त्यांचा अंदाज चुकत असल्याने बऱ्याचदा येथे किरकोळ अपघात घडले आहेत. सोमवारी रात्री एम एच ३१ बियू ७६४ क्रमांकाच्या मोटारसायकल स्वाराचा वर्ध्याहून सेलूकडे जाताना अशाचप्रकारे अंदाज चुकला आणि तो सुरक्षा कठड्यावर धडकून गंभीर जखमी झाला. यावेळी सरपंच संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा पळसगांवचे सरपंच धिरज लेंडे यांनी जखमीच्या मदतीला धावून जात तत्काळ रुग्णवाहिकेस पाचारण केले. दरम्यान त्यांनी प्रादेशिक परिवहन विभागाचे सदर रस्त्याने जाणारे वाहन देखील थांबवले आणि जखमी युवकास रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.

     कान्हापूर नजिकचा त्या जीवघेणा खड्डयाचे गेल्या अनेक दिवसांपासून संथगतीने काम सुरू आहे. याठिकाणी सुरक्षा कठडे देखील चुकीच्या पद्धतीने लावण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरणाऱ्या त्या खड्डयाची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे.

1/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 6 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे