जिल्ह्यातील ठाणेदारांचा खांदेपालट ; सेलूच्या पोलीस निरीक्षक पदी तिरुपती राणे
सचिन धानकुटे
वर्धा : – जिल्ह्यातील बहुतांश पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव नुकत्याच बदल्या करण्यात आल्यात. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी कैलास पुंडकर तर सेलू पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी तिरुपती राणे यांची नेमणूक करण्यात आल्याचा आदेश पोलीस अधीक्षक यांनी नुकताच काढला.
यात दहेगांव येथील पोलीस निरीक्षक योगेश कामाले यांना मात्र पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. समुद्रपूर येथील ठाणेदार प्रशांत काळे यांची आर्वी, हिंगणघाटचे ठाणेदार कैलास पुंडकर यांची वर्धा शहर पोलीस ठाण्यात, अल्लीपूरचे सुनिल गाडे यांची कारंजा, सुनिलसिंग पवार यांची आष्टी, गोपाल भारती यांची जिल्हा विशेष शाखेत, मारोती मुळक यांची हिंगणघाट, आर्वीचे भानुदास पिदूरकर यांची देवळी, देवळीचे तिरुपती अशोक राणे यांची सेलू, खरांगणा येथील संतोष शेगांवकर यांची समुद्रपूर, संदीप धोबे यांची तळेगांव, प्रफुल्ल डाहुले यांची अल्लीपूर, सदाशिव ढाकणे यांची खरांगणा, जिल्हा विशेष शाखेचे विनीत घागे यांची वाहतूक नियंत्रण शाखेत, सायबर सेलचे संदीप कापडे यांची स्थानिक गुन्हे शाखा तसेच सायबर सेलमध्ये नेमणूक करण्यात आली आहे.