दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयात मानक लेखन स्पर्धा ; ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचा उपक्रम

सचिन धानकुटे
सेलू : – स्थानिक दीपचंद चौधरी विद्यालय तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात आज मंगळवारी मानक लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर उपक्रम ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या वतीने राबविण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सुहासिनी पोहाणे तर प्रमुख अतिथी म्हणून ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डचे विक्रांत रोटकर, चिचपाने, महाविद्यालयाचे विभाग प्रमुख मंगेश वडूरकर, प्रा मेघा चंदनखेडे, प्रा राजेश कनोजिया आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आयोजित मानक लेखन स्पर्धेत सुमित झाडे प्रथम, तन्वी उडाण द्वितीय, धनश्री वाघे वानखेडे तृतीय तर कुमीक्षा उरकुडकर हिने चतुर्थ क्रमांक पटकावला. यातील प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम तर इतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बॉटल्स भेट स्वरूपात देण्यात आली.
यावेळी मेंटर म्हणून महाविद्यालयातील प्राध्यापक राजेश गौर यांनी कामकाज सांभाळले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा राजेश कनोजिया यांनी तर आभार प्रा मेघा चंदनखेडे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.