Breaking
ब्रेकिंग

आर्वी कृउबासच्या सभापती पदी सहकार गटाचे संदीप काळे तर उपसभापती पदी भाजपचे प्रशांत वानखेडे अविरोध

1 6 9 6 4 3

राजू डोंगरे

आर्वी : – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज सहकार गटाचे संदीप काळे तर उपसभापती पदी भाजपचे प्रशांत वानखेडे यांची अविरोध निवड करण्यात आली.

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काची बाजारपेठ अशी ओळख असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत सहकार गटाचे संदीप काळे यांची सभापती पदी तर भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रशांत वानखेडे यांची उपसभापती पदी अविरोध निवड करण्यात आली. येथील नवनिर्वाचित संचालकांची संख्या लक्षात घेता विरोधी गटाकडून एकही अर्ज सदर दोन्ही पदासाठी दाखल करण्यात आला नव्हता. सदर बाजार समितीवर नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणित सहकार गटाचा वरचष्मा पहायला मिळाला. येथे सत्ताधारी गटास १६ तर विरोधी गटाला केवळ २ जागांवर विजय मिळाला होता.
आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांच्या मार्गदर्शनात संदीप काळे यांच्या नेतृत्वाखाली संचालकाची निवडणूक पार पडली होती. यावेळी आमदार दादाराव केचे यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी संदिप काळे व प्रशांत वानखेडे यांचे अभिनंदन केले.
यावेळी बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक विजय गुल्हाने, गजानन जवळेकर, गजानन निकम, भिमराव कुराडे, शिरीष महल्ले, प्रज्वल कांडलकर, मधुकर चौकोने, शोभाताई काळे, गायत्री बोके, बाळाभाऊ सोनटक्के, मंगेश मानकर, चेतन टावरी, लखन अग्रवाल, दिलीप भुसारी आदि संचालक मंडळीची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 6 9 6 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे