Breaking
ब्रेकिंग

सिंदी कृउबासच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी उपबाजारपेठेत मतदान आणि मतमोजणी ; १८ जागांसाठी ३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ; तुल्यबळ लढतीचा अंदाज

2 2 5 2 7 6

सचिन धानकुटे

सेलू : – येथील सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उद्या शुक्रवार ता.२८ एप्रिल रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार यावेळेत उपबाजारपेठेतील एकमेव केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. संचालक पदाच्या १८ जागांंसाठी ३६ उमेदवारच निवडणुकीच्या रिंगणात असल्याने तुल्यबळ लढतीचा अंदाज वर्तविला जात आहे. या निवडणुकीत चार मतदार संघ मिळून एकूण १ हजार २२० मतदारच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

ही निवडणूक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा संचालक पदांसाठी होत आहे. याकरिता सहकारी संस्था मतदार संघाच्या अकरा जागांंसाठी बावीस उमेदवार रिंगणात असून ४५१ मतदार, ग्रामपंचायत मतदार संघाच्या चार जागांंसाठी नऊ उमेदवार रिंगणात असून ५५३ मतदार, व्यापारी व अडते मतदार संघाच्या दोन जागांंसाठी तीन उमेदवार रिंगणात असून ८१ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यात सेलू उपबाजारपेठेतील ६० तर सिंदी येथील २१ मतदारांचा समावेश आहे. यासोबतच हमाल व मापारी मतदार संघाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून एकूण १३५ मतदार आपला प्रतिनिधी निवडतील. यात सेलू येथील ६० तर सिंदी येथील ७५ मतदारांचा समावेश आहे. एकंदरीतच अठरा जागांसाठी जवळपास १२२० मतदार मतदान करणार आहेत.
येथे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना अशा सत्ताधारी शेतकरी महाविकास आघाडीशी काँग्रेसच्याच जयस्वाल गट व भाजप युतीच्या उमेदवारांची थेट लढत होणार असल्याने या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. येथे माजी सभापतींच्या उमेदवारीमुळे सत्ताधारी पक्षात काहिशी नाराजी असल्याने त्याचा फायदा नेमका कोणाला होणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत.
उद्या सायंकाळी चार वाजतापर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यानंतर एका तासाने लगेच उपबाजारपेठेत मतमोजणी होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 2 5 2 7 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे