रोहीत पवार यांची समीर देशमुख तर्फे “पुस्तकतुला”
वर्धा : राज्यातील तरुण, बेरोजगार युवक, महीला, विद्यार्थी, छोटे उद्योजक व शेतकर्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता आमदार रोहीत पवार यांनी पुणे ते नागपूर पायदळ 800 किलोमीटर युवा संघर्ष यात्रा सुरु केली आहे. ही यात्रा वर्धा येथे पोहोचताच युवा नेते समीर देशमुख यांनी आमदार रोहीत पवार यांची थोर राष्ट्रपुरुष, संत-महात्मे, महापुरुष, महान व्यक्ती आणि स्पर्धा परिक्षेच्या पुस्तकांनी तुला केली.
सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार रोहित दादा पवार ही यात्रा गाडीने पण करू शकत होते पण तस न करता ते 700 किलोमीटर चालत वर्धा येथे आले. म्हणून त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी थोर राष्ट्रपुरुष, संत-महात्मे, महापुरुष, महान व्यक्ती आणि स्पर्धा परिक्षेच्या पुस्तकांनी तुला केल्याचे समीर देशमुख यांनी सांगीतले. या प्रसंगी उपस्थितांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला.