Breaking
ब्रेकिंग

उद्यापासून पोलीस भरतीची मैदानी परीक्षा : वर्ध्यात 33 जागांसाठी 2091 अर्ज

2 4 7 1 7 2

किशोर कारंजेकर 

वर्धा : राज्य पोलीस दलातील रिक्त पदांसाठी गृह विभागाने पोलीस भरतीचा निर्णय घेतला असून मुंबईसह राज्यातील १७ हजार ४७१ पदांसाठी तब्बल १७ लाख ७६ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. बुधवारपासून उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू होणार आहे. वर्ध्यात 33 पदांसाठी 2091अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. यात 20 जागा जनरल आणि 13 जागा अनुकंपा प्रक्रियाद्वारे भरण्यात येणार आहे.

कॉपी, डमी आणि चिप अदलाबदली करण्याच्या घटना घडू नयेत, याची खबरदारी घेतली आहे, असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

राज्यातील पोलीस दलात रिक्त पदे आहेत. रिक्त पदामुळे पोलीस यंत्रणेवर ताण पडत होता. त्यामुळे गृह विभागाने १७ हजार ४७१ पदे भरण्याचा निर्णय घेतला. २०२२-२३ मध्ये पोलीस भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. पण लोकसभा निवडणुकीच्या कामाचा ताण असल्याने पोलीस भरती प्रक्रिया राबवणे शक्य नव्हते. निवडणुकीचा ताण कमी झाल्यावर भरतीची तयारी केली गेली. मुंबईसह राज्यात १७ लाख ७६ हजार २५६ उमेदवारांची मैदानी चाचणी बुधवारपासून सुरू होत आहे. पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई, बँडसमन या पदासाठी ही भरती होत आहे. या भरतीमध्ये एकाच उमेदवाराने दोन पदांसाठी देखील अर्ज केले आहेत. दोन्ही पदांसाठी एकाच वेळी मैदानी चाचणी असल्यास अशा उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी अन्य वेळेत चाचणीला जाण्यास मुभा देण्यात येणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात मैदानी आणि लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी सांगितले. एक उमेदवार हा दोन ठिकाणी अर्ज करू शकत नाही. मात्र तो दोन वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करू शकतो. ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असेल त्या दिवशी मैदानी परीक्षा पुढे ठेवली जाईल. पावसाचा अंदाज पाहून मैदानी परीक्षेची माहिती उमेदवारांना कळवण्यात येईल. मैदानी आणि लेखी परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांची व्यवस्था वेल्फेअर हॉलमध्ये करण्यात येणार आहे. यापूर्वी भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना राहायची व्यवस्था नसल्याने नाराजीचा सूर उमटला होता. पर जिल्ह्यातून मुंबईत भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना रात्र रस्त्यावर काढावी लागत होती. रस्त्यावर झोपताना डास चावणे, झोप पुरेशी होत नसल्याच्या तक्रारी उमेदवाराच्या होत्या. पण पावसात मैदानी परीक्षा असल्याने त्या उमेदवारांची योग्य व्यवस्था केल्याने त्याचा उमेदवारांना फायदा होणार आहे.

परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे. गेल्या भरतीच्या वेळी जे गैरप्रकार झाले ते होणार नाहीत. याची काळजी घेण्यात आली आहे. तसेच गेल्या भरतीच्या वेळेस गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारावर गुन्हे दाखल झाले होते. तसेच यंदा देखील गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 4 7 1 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे