प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा मौत का कुआ..! रेहकीत कंत्राटदार मरणासन्न वर्माचा नागरिकांच्या जीवाशी खेळ
किशोर कारंजेकर
वर्धा : – प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने जिल्ह्यातील रेहकी येथे मौत का कुआ तयार करण्यात आलायं. याठिकाणी गुरुवारी एक बालक पाण्यात बुडाला अन् थोडक्यात मरता मरता वाचला. सदर कामाच्या कंत्राटदाराला आणि संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात वारंवार स्थानिक प्रशासनाने अवगत केले. परंतु कंत्राटदार मरणासन्न वर्माने नागरिकांच्या जीवाशी एकप्रकारे खेळचं मांडला आहे आणि दुसरीकडे संबंधित प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांनाही घाम फुटत नाही, त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावरचं प्रशासन खडबडून जागे होणार का, हा खरा प्रश्न आहे.
रेहकी येथे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून पूल आणि नाल्या शेजारील सुरक्षा भिंत उभारण्यात आली आहे. सदर कामाचं कंत्राट भाजपचे आमदार परिणय फुके यांचा आप्तेष्ट असलेल्या फुकट्या कंत्राटदाराने घेतलं आहे. सदर कामाचं उपकंत्राट “त्या” फुकट्याने मरणासन्न अवस्थेत असलेल्या वर्मा नामक कंत्राटदाराला दिले आहे. त्या भामट्याने सुरक्षा भिंत उभारताना नाला खोलीकरण केले. त्याठिकाणी दोन माणसं एवढ्या खड्डयात सध्या पाणी भरून आहे. ह्याच खड्डयात गुरुवारी दुपारी एक बारा वर्षीय बालक बॉल काढण्यासाठी पाण्यात उतरला. बघता बघता तो पाण्यात गटांगळ्या खात बुडाला देखील, परंतु सुदैवाने एका युवकाने प्रसंगावधान राखत त्यास जीवदान दिले.
सदर घटनेनंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अभियंता डेकाटे आणि खान या दोघांनाही यासंदर्भात जाब विचारण्यासाठी संपर्क साधला असता दोघांनाही घाम फुटला नाही हे विशेष..! त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावरचं प्रशासन खडबडून जागे होणार का हा खरा प्रश्न आहे.