Breaking
ब्रेकिंग

धक्कादायक..! महाठग शरद कांबळेने खातेदारांना दिलेले धनादेश BOUNCE  : शेतकरी महिला निधी लिमिटेडच्या भामटेगिरीचा नवा फंडा

2 6 9 1 7 0

सचिन धानकुटे

सेलू : – शेतकरी महिला निधी लिमिटेडचा अध्यक्ष शरद कांबळे ह्याने दरम्यानच्या काळात खातेदारांना दिलेले धनादेश आता BOUNCE झाल्याने त्यांच्या भामटेगिरीचा नवा फंडा नुकताच समोर आला. शरद कांबळे यांनी खातेदारांना दिलेल्या धनादेशावरील स्वाक्षरीचं चुकीची असल्याने सदर धनादेश रिटर्न आल्याचं प्रकरण नुकतचं उघडकीस आले आहे. यामुळे धनादेश मिळालेल्या खातेदारांत मोठी खळबळ उडाली आहे.

      शेतकरी महिला निधी लिमिटेडच्या विविध शाखांमधून खातेदारांना गेल्या फेब्रुवारी महिन्यांपासून साधी दमडी देखील मिळाली नाही. त्यामुळे खातेदारांनी अध्यक्ष शरद कांबळे यांना गाठून यासंदर्भात जाब विचारला. यावेळी काही खातेदारांना धनादेश देण्यात आले होते. सदर प्रकरण शेवटी पोलिसांत पोहचले आणि अध्यक्ष शरद कांबळे यांना अटक झाली. अटकेनंतर शरद कांबळे यांना आधी आठ व नंतर सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सदर पोलीस कोठडी सोमवार ता.८ रोजी संपल्याने सध्या त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी याकाळात सदर गैरव्यवहारातील मास्टरमाईंड रोशन कांबळे, शरद कांबळे यांच्या सौभाग्यवती प्रियंका कांबळे, संचालक फुलझेले या भामट्यांना मात्र अद्याप अटक केली नाही हे विशेष..! दरम्यानच्या काळात बँकेच्या शाखांतील व्यवहारांची कसून चौकशी करण्यात आली. परंतु बँकाच्या शाखांमधून रोशन कांबळे सर्वेसर्वा असलेल्या ज्या वंडरलॅड वॉटरपार्क‌‌‌मध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत गुंतवणूक करण्यात आलीयं, त्या भामट्या रोशन कांबळेला अद्याप अटक करण्याचे सौजन्य आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी का दाखविले नाही हे एक न उलगडणारे कोडे आहे.

      दरम्यान शेतकरी महिला निधी लिमिटेडच्या एका खातेदाराने त्याला मिळालेला धनादेश बँकेत वटविण्यासाठी लावला असता, सदर धनादेश हा अध्यक्ष शरद कांबळे यांनी केलेल्या चुकीच्या स्वाक्षरीमुळे परत आला आहे. यासंदर्भात सदर खातेदार लवकरच पोलिसांत तक्रार दाखल करणार असून शरद कांबळे यांच्या अडचणीत भर पडणार हे नक्की..! मनोज कृष्णाजी पाहुणे नामक खातेदारांस महाठग शरद कांबळे यांनी १ लाख २० हजारांचा धनादेश ता.२६ एप्रिल रोजी दिला होता. पाहुणे यांनी सदर धनादेश ता.४ जुलै रोजी बँक ऑफ इंडियाच्या शाखेत लावला असता तो ता.५ जुलै रोजी स्वाक्षरी चुकीची असल्याचे कारणास्तव परत आला आहे. यासंदर्भात खातेदार पाहुणे आता पोलिसांत तक्रार दाखल करणार असून महाठग शरद कांबळे यांच्या अडचणी वाढणार असल्याचे सांगितले जाते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 9 1 7 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे