Breaking
ब्रेकिंग

वर्ध्याच्या सावंगीत मध्यरात्री रक्तरंजित राडा..! लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, तरुणी गंभीर जखमी

2 4 6 8 7 4

किशोर कारंजेकर

वर्धा : – लोखंडी रॉडने डोक्याला केलेल्या मारहाणीत युवकाचा जागीच मृत्यू झाला तर युवती गंभीर जखमी झाली. शहरालगतच्या सावंगी(मेघे) परिसरातील ड्रीम लॅंड सिटीतील साई पार्कमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास हा रक्तरंजित राडा घडला.

यातील मॄतक मोहीत माहुर्ले, जखमी युवती आणि आरोपी प्रवीण सोनटक्के असे तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. काल रविवारी सावंगी येथे शिक्षणासाठी वास्तव्य करणाऱ्या युवतीचा वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी मॄतक मोहीत आणि आरोपी प्रवीण असे दोघेही वर्ध्याच्या सावंगीत आले होते. मॄतक मोहीत हा युवतीचा नातलग असल्याने रात्रीला तो तीच्या खोलीवरच थांबला. दरम्यान आरोपी प्रवीणने मध्यरात्रीच्या सुमारास त्याठिकाणी जावून मोहीतसह युवतीला लोखंडी रॉडने मारहाण केली. यात मोहीतच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर युवती देखील गंभीर जखमी झाली. तीच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. यातील आरोपी प्रवीण सोनटक्के यास याप्रकरणी सावंगी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने सदर कृत्य का केले, यासंदर्भात सावंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

घटनास्थळाची पाहणी केली असता, एका तीन खोल्यांच्या घरात प्रियकर आणि प्रेयसी हे दोघे आणि आणखी एक मुलगी होती. घराचे दार तुटलेल्या अवस्थेत नव्हते. म्हणजेच घराचे दार हे या तिघांपैकी कोणीतरी उघडले असावे. एकटा व्यक्ती दोघांना एकाचवेळी मारणे हेही काही शंका उपस्थित करतात. घटनास्थळाबाहेरचे cctv पुटेज सावंगी पोलिसांनी मिळविले असून, त्यात नेमकं काय आहे, ही माहिती अद्याप पोलिसांनी राखून ठेवली आहे.

3.8/5 - (5 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 4 6 8 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे