अन्नाला लावणाऱ्या ॲड. भैय्याजी यांना विसरणारा राजा जाधव जेव्हा गजाचे डोळे पुसतो…

किशोर कारंजेकर :
वर्धा : संस्था हडप्या गजा खोटेवार याचा सत्कार फेल गेल्याने सर्व सुन्न झाले आहे. त्याच्या काळ्या कृत्याची चर्चा शहरात जोरात सुरू असल्यानं तसेच सर्व वृत्तपत्रांनी बहिष्कार टाकल्याने गज्या घरात तोंड लपवून बसला. देवाणघेवाण करीत प्राचार्य झालेल्या जाधवला त्याने झापला. तू पैसे जमा केले पण पत्रकारांना जाहिराती का दिल्या नाही म्हणून जाधववर नको त्या शब्दात तोंड सुख घेतले.
रडकुंडीस आलेल्या गज्याला समजविण्यासाठी राजा जाधवने मग बातम्या आल्या नाही तर फरक पडत नाही. मी फेसबुकवर तुमची तारीफ करतो, असे सांगितले. वृत्तपत्र ताकद दुर्लक्षित करणाऱ्या राजुने मग पारायण लिहून फेसबुकवर टाकले. असा हा पण विश्वासघाती असल्याची चर्चा गावात सुरू झाली. याला जगताप परिवाराने आश्रय दिला होता. घरगडी म्हणून काम करीत तिथेच शिकला. त्यावेळी ॲड. भैय्याजी संस्था चालवीत होते. त्यांच्याकडे जगताप यांनी शब्द टाकला. राजू मग नौकरीस लागला. पण त्याचवेळी संस्था हडपनाऱ्या गजा खोटे यांने राजुला कामावरून काढून टाकले. कारण राजू सांगू शकतो. मग भय्याजी यांनीच पैसे देत राजुला कोर्टात पाठविले, अशी माहिती भैय्याजी यांच्या संस्थेतील समर्थकाने दिली. कोर्टातून जिंकल्यामुळे गजुला मन जड करीत राजू यास कामावर घ्यावे लागले. पण राजू मिठाला लावणाऱ्या भैय्याजी यांना पूर्णपणे विसरला, असे दुःख या समर्थकांनी व्यक्त केले. तो कुठंही त्यांचे नाव घेत नाही. पुढे जगताप यांचा दिवाणजी म्हणून राजुला गावात ओळखल्या जावू लागले. त्या घराची राखणदारी, कंपाउंड बांधणे, पाणी मारणे अशी कामे राजू करायचा. कारण या घरात त्याला वाट्टेल ते काम करण्याची मोकळीक मिळाली होती.
आता तो जगताप कुटुंबास विसरून गजा खोटेची तारीफ करीत आहे. वंजारी, अडबले यांना मीच निवडून आणले, अशी फुशारकी हा मारत असतो. तसेच एकेक पत्रकाराला पाहून घेईन, अशी धमकी देत सुटला आहे. याच्या लग्नाचे किस्से अद्याप बाकी आहेत. लेखणीची ताकद याला दाखविण्याचा निर्धार पत्रकारांनी केला आहे.