माहेर शांती निवासातील महिला मेळाव्याला महिलांचा उदंड प्रतिसाद ; आदर्श मातापित्यांसह महिलांचा सन्मान
सचिन धानकुटे
सेलू : – स्थानिक माहेर शांती निवासात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्याला महिलांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी आदर्श मातापित्यांसह महिलांचा देखील सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला देवळीच्या माजी नगराध्यक्ष तथा नगरपरिषदेच्या गटनेत्या शोभाताई तडस, घोराडच्या सरपंच ज्योती घंगारे, कोटंबा येथील सरपंच रेणुका कोटंबकार, खापरी येथील सरपंच प्रिती वैद्य, ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ पल्लवी खेडेकर, बरखा चौधरी, भाग्यश्री भांडेकर, वनिता चलाख, रेश्मा रघाटाटे, अँड शिवानी सूरकार, संगिता बढे, हेमंत काकडे, रामेश्वर धर्मुळ यांच्यासह माहेरच्या संस्थापिका सिस्टर लुसी कुरीयन आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी सरपंच ज्योती घंगारे यांनी माहेरच्या अप्रतिम कार्याचे कौतुक करीत संस्थापिका लुसी कुरीयन यांचा शाल, श्रीफळ व समई भेट देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी बोलताना दिदी यांनी लवकरच सावंगी(मेघे) येथे महिलांसाठी माहेर हिरा निवास सुरू करणार असल्याचे उपस्थितांना सांगितले. यावेळी रामेश्वर धर्मुळ यांनी माहेरच्या निस्वार्थ कार्याने प्रभावित होऊन संस्थेला ५१ हजार रुपये मदतीचा धनादेश प्रदान केला. यावेळी आयोजित महिला मेळाव्यातील तीन महिलांना भेट स्वरूपात पैठणी देखील देण्यात आली तसेच माहेर संस्थेच्या हितचिंतक व स्नेहींचा सन्मान देखील करण्यात आला. यावेळी प्रतिभा प्रमोद उडाण व सुशिला बाबाराव थुल ह्या आदर्श मातापित्यांनाही गौरविण्यात आले. याप्रसंगी घोराडच्या आशा वर्कर यांनी माहेरची संकल्पना पथनाट्याद्वारे सादर केली तर स्कुल ऑफ ब्रिलीयंटच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
यावेळी माहेरची भुमिका प्रकाश कोठावळे यांनी तर प्रास्ताविक संदीप म्हैत्रे यांनी तर आभार प्रकल्प प्रमुख अतुल शेळके यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पल्लवी कातपूरे व शुभम धरवार यांनी केले. कार्यक्रमाला घोराड, झडशी, खापरी, वर्धा, उमेद समूह सेलू, साटोडा येथील महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माया शेळके, प्रमोद काटवे, पवन चव्हाण, प्रज्वल लटारे, अनिता उरकुडे यांनी अथक परिश्रम घेतले.