Breaking
ब्रेकिंग

खळबळजनक..! एमबीबीएसच्या विद्यार्थीनीची तीसऱ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या, सावंगीच्या वैद्यकीय महाविद्यालयातील घटना

2 5 4 3 2 2

किशोर कारंजेकर

वर्धा : – एमबीबीएसच्या विद्यार्थीनीने प्राचार्यांच्या जाचाला कंटाळून तीसऱ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास सावंगी(मेघे) येथील वैद्यकीय महाविद्यालयात घडली. मॄतक विद्यार्थीनी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत असून महाविद्यालय प्रशासन परिक्षेला बसू देणार की नाही या काळजीपोटी तीने आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे.

    सावंगी मेघे येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये नागपूर येथील पूजा रजनी(वय२२) ही विद्यार्थीनी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होती. नियमानुसार परिक्षेला बसण्यासाठी ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. परंतु कॉलेजच्या नियमानुसार तीची हजेरी कमी होती. त्यामुळे प्राचार्यांनी तीला परिक्षेला बसू देणार नाही, अशी तंबी दिली. तीने परिक्षेला बसू देण्यासाठी प्राचार्यांना विनंती देखील केली. परंतु त्यांनी तीचं काही एक ऐकून घेतले नाही. शेवटी हताश झालेल्या त्या विद्यार्थीनीने प्राचार्यांच्या कार्यालया समोरील तीसऱ्या माळ्याच्या गॅलरीतून खाली उडी घेत आत्महत्या केली. यात तीचा मॄत्यू झाला महाविद्यालय परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

      काही दिवसांपूर्वीच येथे नर्सिंगच्या विद्यार्थीनीची तीच्या प्रियकरासह प्रेमाच्या त्रिकोणातून हत्या करण्यात आली होती. सदर घटनेमुळे पुन्हा एकदा याठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

4.5/5 - (4 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 5 4 3 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे