Breaking
ब्रेकिंग

युपीआयच्या माध्यमातून बँक खात्यातील १ लाख लंपास..! छत्तीसगडच्या भिलाईतील दोन भामटे गजाआड, सायबर पोलिसांची कारवाई

2 5 4 4 5 5

सचिन धानकुटे

वर्धा : – सायबर पोलिसांनी बँकेच्या खात्यातील रक्कम परस्पर दुसऱ्या खात्यात वळती करणाऱ्या दोन भामट्यांना छत्तीसगडच्या भिलाईतून गजाआड केले. आकाश लालबाबू चौधरी (वय२५) व तोमेश लक्ष्मीनारायण निषाद (वय२७) रा. भिलाई, जिल्हा दुर्ग, छत्तीसगड अशी त्या भामट्यांची नावं आहेत.

     मिळालेल्या माहितीनुसार, साकुर्ली(धानोली) येथील शेतकरी हर्षल महाबुधे यांचं पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत खाते आहे. ते दैनंदिन व्यवहारासाठी फोन-पे, गुगल-पे सह मोबाईल रिचार्जसाठी ॲमेझान-पे सुद्धा वापरत होते. दरम्यान ता.१९ मे रोजी सकाळी झोपेतून जागे होताच त्यांनी मोबाईल बघितला असता त्यांना युपीआयच्या माध्यमातून बँक खात्यातील ३०-३० हजार तीन वेळा व १० हजार एक वेळा गायब झाल्याचे दिसून आले. त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कोणतेही ॲप डाऊनलोड केले नाही, किंवा लिंक ओपन केली नाही. एवढेच नव्हे तर कुणाला फोन देखील केला नाही, परंतु खात्यातील एक लाख रुपये मात्र अचानक गायब झाले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी तत्काळ १५ हजार रुपये होल्ड करीत ८५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याने गुन्हा दाखल करून घेत तपासाला गती दिली.

   दरम्यान सायबर पोलिसांना तांत्रिक विश्लेषणानंतर भिलाईच्या आकाश चौधरी नामक इसमाच्या खात्यात सदर रक्कम वळती झाल्याचे आणि यात तोमेश निषाद सहभागी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी दोन्ही भामट्यांना शनिवार ता.२७ रोजी भिलाई येथून ताब्यात घेत त्यांच्याकडील ३ मोबाईल, ११ सिम कार्ड, १० एटीएम कार्ड, १३ चेकबुकसह ४ बँक पासबुक असा एकूण ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यातील दोन्ही भामट्यांना न्यायालयाने ता.५ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, निलेश तेलरांधे, अनुप राऊत, अमित शुक्ला, विशाल मडावी, अनुप कावळे, रणजित जाधव, वैभव कट्टोजवार, अक्षय राऊत, अंकित जिभे, पवन झाडे, लेखा राठोड, प्रतिक वांदिले आदि कर्मचाऱ्यांनी केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 5 4 4 5 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे