Breaking
ब्रेकिंग

BDO सुनीता मरस्कोल्हे यांनी केला अमर काळेचा प्रचार : संभाषणाची ऑडिओ क्लिप RNN च्या हाती : “ती मी नव्हेच” ठरणार “तीच आहे मी”

2 0 3 2 4 8

किशोर कारंजेकर 

वर्धा : लोकशाहीच्या उत्सवात शासकीय अधिकाऱ्यांना आपली भूमिका निस्पक्षच ठेवने बंधनकारक असते. पण काही अधिकारी आपले कर्तव्य विसरून थेट प्रचाराचा भाग होत असेल तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणे, हेही तेवढेच गरजेचे आहे. अशाच आर्वीच्या BDO सुनीता मरस्कोल्हे यांच्या प्रचाराची ऑडिओ क्लिप RNN च्या हाती आली आहे. त्या ऑडिओ क्लिप मध्ये या महिला अधिकारी अमर काळे यांचा प्रचार करित असल्याचे स्पष्ट होतांना दिसते आहे. RNN ने याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त उरविंदर पाल सिंग यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदविली आहे.

वर्धा लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे उमेदवार अमर काळे होते. अमर काळे हे आर्वीचेच. आणि सुनीता मरस्कोल्हे या आर्वी पंचायत समितीत BDO आहेत. अमर काळे यांच्या प्रचाराला उद्धव ठाकरे, शरद पवार हे हिंगणघाटला 24 एप्रिलला आले होते. त्यांच्या एक दिवसापूर्वी या सुनीता मरस्कोल्हे यांचे नातेवाईक असलेले नागपूरचे सतीश पेंदाम यांनी आर्वीच्या अमोल सुरवाळे यांना कॉन्फरन्सवर घेऊन BDO सुनीता मरस्कोल्हे या अमर काळे यांना विजयी करण्यासाठी प्रचार करित असल्याचे बोलत आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये BDO सुनीता मरस्कोल्हे या सतीश पेंदाम हे माझे रिलेटिव्ह असल्याचे सांगत आहेत. शिवाय अमर काळे आणि अनिल देशमुख यांना नक्की सांगा की, मी अमर काळे यांचा प्रचार करित आहे, असेही सुनीता मरस्कोल्हे बोलत आहेत.

याबाबत BDO सुनीता मरस्कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता, “ती मी नव्हेच” असेच सांगितले. प्रत्यक्षात या BDO सुनीता मरस्कोल्हे यांना हा प्रचार करण्यासाठी किती आर्थिक सुबत्ता आली याचाही सोक्ष-मोक्ष लावण्यासाठी RNN ने रीतसर तक्रार नोंदविली आहे. 

 

पुढील भागात वाचा : संपूर्ण व्हायरल क्लिप आणि BDO सुनीता मरस्कोल्हे यांची घरी आणि ऑफिसमधील हुकूमशाही

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 3 2 4 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे